Shivsena Leader Aditya Thackeray Latest News
Shivsena Leader Aditya Thackeray Latest News Sarkarnama
कोकण

जनतेच्या डोळ्यात अश्रू होते, तेव्हा हे ४० गद्दार निर्लज्जपणे टेबलावर नाचत होते...

सरकारनामा ब्यूरो

सावंतवाडी : शिवसेना (Shivsena) नेते आणि माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शिव संवाद यात्रेचा दुसरा टप्पा आज सिंधुदुर्ग जिल्ह्या येथून सुरू झाला असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी कुडाळ येथे आदित्य यांच्या शिव संवाद यात्रेला शिवसैनिकांनी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यानंतर सावंतवाडीत झालेल्या मेळाव्यात आदित्य त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. (Shivsena Leader Aditya Thackeray Latest News)

बंडखोरांना त्यांच्या लायकीपेक्षा पक्षानं जास्त दिलं आहे. हे बेईमानांच आणि गद्दारांच सरकार आहे. तुम्ही उठाव केला असता तर जागेवर थांबून केला असता. मात्र तुम्ही गद्दारी केली म्हणून तुम्ही गद्दार म्हणूनच जगणार आहेत. हे गद्दारी करून आम्ही शिवसेना वाचवली असं म्हणत आहेत आणि स्वत:ला खरे शिवसैनिक म्हणवून घेत आहेत. मात्र, पक्षप्रमुखांचा आदेश न पाळणारे अन् टेबलावर नाचणारे शिवसैनिक असू शकत नाहीत, हे जर खरे शिवसैनिक असते तर आसाममध्ये आलेल्या पूराच्या पाण्यात उतरून त्यावेळी त्यांनी तेथील लोकांची मदत केली असती तर त्यांना मानलं असत,असा घणाघात आदित्य यांनी बंडखोर आमदारांवर केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, हे गद्दारी करून प्रथम सुरतला गेले तिथे जे मिळालं असेल ते मिळालं असेल मला माहिती नाही. नंतर डोंगर बघायला गुवाहाटीला गेले. डोंगरच बघायचा होता तर सह्याद्रीचा बघायला यायच असतं. कोकण पण सुंदर आहे. हे उठाव केल्याच सांगत पळून गेले. जर हे शिवसैनिक असते तर आसाममध्ये पूर आला असतांना हॅाटेलमध्ये असतांना टी-शर्ट आणि ट्रॅक पॅंन्ट घालून मस्ती केली नसती. मज्जा केली नसती. हे जेव्हा गुवाहाटीला हॅाटेलमध्ये होते. तेव्हा तिथे पूर आला होता. लाखो लोकांना राहायला घर नव्हते. खायला अन्न नव्हते, घालायला वस्त्र नव्हते. तेव्हा हे मस्ती करत होते. हे जर शिवसैनिक असते तर यांनी त्यावेळी पूराच्या पाण्यात उतरून तेथील लोकांची मदत केली असती तर त्यांना मानलं असत. मात्र यांचे तिथे मतदार नसल्याने यांनी मदतकार्य केलं नाही. यांनी तेव्हा मज्जा मारली. हे खोट बोलत आहेत, असा हल्लाबोल आदित्य यांनी बंडखोरांवर केला.

ते पुढे म्हणाले की, तेथून ते गोव्याला गेले. ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तेव्हा राज्यातील जनतेच्या शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू होते मात्र, हे गद्दार निर्लज्ज टेबलवर उभे राहून निर्लज्जपणे नाचत होते, अशी टीका त्यांनी बंडखोरांवर केली.

दरम्यान, आदित्य यांनी सावतंवाडीत बोलत असल्याने बंडखोर आमदार दिपक केसरकरांच नाव न घेता त्यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले की, आता इथले महाशय यांचं तर मी नाव घेणार नाही कारण ते लगेच माझ वय काढतात. त्यामुळे मी त्यांच नाव घेणार नाही. याचबरोबर मी कधीही कुणाला मला साहेब म्हणा असं म्हटल नाही, असेही स्पष्टीकरणं दिलं.

मला मोठ्यांनी आदित्या म्हणा, लहानांनी आदित्य म्हणा तर कुणी मला एटी म्हणतं मात्र आपण कधीही कुणाला साहेब म्हणा,असे म्हटलं नाही. मात्र, पक्षाने मला शिवसैनिक अशी ओळख दिली आहे. मात्र, मला अभिमान आहे की मी कधी माझी ओळख आणि नाव विकलं नाही. याबरोबरच असेही म्हटलं जात की मी आल्यावर उभे रहावे लागते. मात्र मी कधी म्हटलं नाही की मी आल्यावर उभे रहा. उलट कुणी आलं तर मी स्वत: दरवाजा उघडायचो. मी कधी उद्धटसारखं वागलो नाही. कारण तसे माझ्यावर संस्कार झालेले नाहीत, असेही आदित्य म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT