Yogesh Kadam, Uddhav Thackeray And Dapoli Nagar Panchayat sarkarnama
कोकण

Dapoli Nagar Panchayat Election : दापोली नगरपंचायतीत योगेश कदमांची उबाठा गटाला धोबीपछाड? नगराध्यक्षपदी कृपा घाग निश्चित? औपचारिक घोषणा मात्र बाकी

Shivena politics : दापोली नगरपंचायतीत उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव 16 विरूध्द 1 अशा बहुमताने मंजूर करण्यात आला.

Aslam Shanedivan

Dapoli News : दापोली नगरपंचायतीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी चांगलाच धक्का दिला आहे. त्यांनी येथे सत्तापालट करताना शिवसेनेची (शिंदे) सत्ता आणली आहे. येथे नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव बहुमताने मंजूर करत त्यांनी ठाकरे गटाला धक्का दिलाय. आता येत्यादोन दिवसांत नगराध्यक्ष पदाच्या निवड केली जाणार असून फक्त एकच अर्ज दाखल झाला आहे. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका कृपा घाग यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध होणार आहे. तर आता फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

दापोली नगरपंचायतीच्या बहुचर्चित नगराध्यक्ष पदावरून येथे जोरदार राजकारण तापलं होतं. मंत्री कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या सत्तेलाच सुरूग लावण्याचे काम केले. तसेच नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याविरोधात अविश्वास आणला. यामुळे ठाकरे गटाची असलेली सत्ता संपुष्टात आली. त्यानंतर नगराध्यक्ष पदावरून शिंदे गटात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती. तर ज्येष्ठ नगरसेविका कृपा घाग आणि शिवानी खानविलकर यांची नावांची जोरदार चर्चा सुरू झाली होती. पण आता कृपा घाग यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचीच नगराध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात आहे.

अविश्वास ठराव

दापोली नगरपंचायतीमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना उबाठा गटाच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांच्या विरोधात सर्व नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी यांनी याची अंमलबजावणी केली. यावेळी सदर ठराव 16 विरुद्ध 1 मतांनी मंजूर करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे ममता मोरे यांच्या नगराध्यक्ष पदावर अनिश्चिततेची टांगती तलवार कायम होती.

या ठरावाच्या विरोधात नगराध्यक्ष ममता मोरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच या ठरावाच्या वेळी कोणत्याही प्रकारचा ठराव मांडण्यात आलेला नाही. यामुळे ही प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण आता जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार कृपा घाग यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे. छाननी देखील पार पडली असून त्यांचा अर्ज वैध्य ठरला आहे. यामुळे आता कृपा घाग यांच्या नगराध्यक्ष पदाच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी आहे. ही औपचारिक घोषणा 28 मे रोजी होणार असल्याचे समजते.

सत्ता स्थापन करताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी योगेश कदम आमदार असतानीही त्यांना नगरपंचायतीच्या राजकारणापासून अलिप्त ठेवले होते. त्याचाच वचपा कदम यांनी आता काढत सत्ता शिवसेनेकडे (शिंदे) आणली आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटाने उबाठा गटाला धोबीपछाड दिल्याचे दापोलीत बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT