uddhav thackeray, uday samant And Ratnagiri Assembly constituency issue sarkarnama
कोकण

Eknath Shinde And Uday samant : एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची 'मतचोरी' कशी केली? ठाकरेंच्या शिलेदारानं फोडला बॉम्ब!

Shivsena UBT On Bogus Voters Scam in Ratnagiri : देशात मतदान चोरीचा विषय गाजत असतानाच विविध ठिकाणी मतचोरीसह मतदार यादीत बोगस नावे आणि दुबार नावे समोर येत आहेत. असाच प्रकार तळकोकणात उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

Aslam Shanedivan

  1. शिवसेनेचे माजी आमदार बाळ माने यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात तब्बल 23 हजार बोगस मतदार असल्याचा दावा केला आहे.

  2. त्यांनी “पेन ड्राईव्ह बॉम्ब” फोडत निवडणूक आयोगाला ही नावे रद्द करण्याची मागणी केली आहे.

  3. या खुलाशामुळे रत्नागिरीतील राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून निवडणूक आयोगावर कारवाईसाठी दबाव वाढला आहे.

Ratnagiri News : काँग्रेसकडून भाजप आणि निवडणूक आयोगावर मतचोरीवरून आरोप अद्याप सुरूच आहेत. अशातच तळकोकणात देखील मतचोरीचा प्रकार घडल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला आहे. रत्नागिरी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिनसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावरच आरोप केला आहे. शिंदे आणि उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मतांची चोरी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ज्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला मतचोरीच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागणार आहे. तसेच उबाठाने पेन ड्राईव्ह बॉम्ब’ फोडत निवडणूक आयोगाला दणका दिल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रशासनही जोरदार तयारीला लागले आहे. प्रभाग रचनेसह आता सभापतीचे आरक्षणही सोडत पार पडली आहे. आता काहीच दिवसात महानगर पालिका आणि नगर पालिकांच्या नगराध्यक्षाचेही आरक्षणाची सोडत होईल. तसेच पंचायत समिती गण आणि गटाच्याही आरक्षणाचीही सोडत होईल.

पण त्याआधीच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात तब्बल 23 हजार बोगस मतदार असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं करून खळबळ उडवून दिली आहे. पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी, ‘उमेद’च्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करताना एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले आहे. त्यांनी, शिंदे यांनी ‘उमेद’च्या अधिकाऱ्यांचा निवडणुकीत गैरवापर केल्याचा दावा केला आहे. शिंदे यांनी आपल्या बळाचा वापर करून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’च्या अधिकाऱ्यांना बचत गटांना आमिष दाखवायला लावले, असाही अरोप केला.

तसेच निवडणुकीच्या काळात रत्नागिरीतही अशाच एक महिला अधिकारी उदय सामंत यांच्या प्रचाराचे काम करत होत्या असाही खळबळजनक आरोप शिवसेनेकडून आता करण्यात आला आहे. तर त्यावेळी निवडणुकीपूर्वीच्या सर्व्हेनुसार उदय सामंत यांचा पराभव होईल अशी चर्चा होती. मात्र सामंत यांचा विजयी झाला. यात काही बोगस मतदारांचा समावेळ असल्याचा संशय देखील माने यांनी व्यक्त केला.

माने यांनी बोगस मतांच्याबाबतीत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडताना मतदारसंघातील ही बोगस नावे रद्द करावीत अशी मागणी केली आहे. तसेच जर आयोगाने ही नावे न हटवल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

यावेळी माने म्हणाले की, मतदारसंघात अशा पद्धतीने बोगस मतदार असल्याचा संशय आम्हाला विधानसभा निवडणुकीच्या वेळीच आला होता. त्यापद्धतीने आम्ही ती माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडे आणि निवडणूक निरीक्षकांना दिली होती. तसेच त्यावेळीच बोगस मतदार यादीही त्यांच्याकडे सुपूर्द केली होती. मात्र निवडणूक निरीक्षकांनी आमची बाजू ऐकूनच घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान अशाच पद्धतीने मुरबाड तालुक्यातील मतदार याद्यांमध्ये देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुरबाडमध्ये हजारो बोगस, दुबार नावे सापडली असून ती ग्रामसभेत मतदार यादीच्या वाचनात उघड झाली आहेत. येथे मतदार यादी वाचनाच्या तब्बल 25 हजार बोगस आणि दुबार नावे उघड झाली आहेत. जी आता वगळली जाणार आहेत. मतदार यादी वाचनाच्या उपक्रम करण्याच्या सूचना मुरबाडच्या तहसीलदारांच दिल्या होत्या. ज्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तर सन 2009 च्या विधानसभेला पंचवीस हजार बोगस मताची भर पडली होती. जी कमीच करण्यात आली नाहीत असेही आता उघड झाले आहे.

FAQs :

प्र.१: बाळ माने यांनी कोणता आरोप केला आहे?
उ: त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात तब्बल 23 हजार बोगस मतदार असल्याचा आरोप केला आहे.

प्र.२: या प्रकरणात बाळ माने यांनी काय पुरावे दिले?
उ: त्यांनी “पेन ड्राईव्ह बॉम्ब” म्हणत डिजिटल स्वरूपात पुरावे सादर केले आहेत.

प्र.३: शिवसेनेने कोणती मागणी केली आहे?
उ: बोगस मतदारांची नावे रद्द करून नव्याने यादी तयार करण्याची मागणी केली आहे.

प्र.४: हा आरोप कोणत्या पक्षावर करण्यात आला आहे?
उ: शिवसेनेने हा आरोप निवडणूक आयोग आणि प्रशासनावर निष्काळजीपणाचा केला आहे.

प्र.५: या आरोपामुळे काय परिणाम होऊ शकतात?
उ: रत्नागिरीत राजकीय तणाव वाढू शकतो आणि निवडणुकीपूर्वी मतदार यादीत बदल होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT