Narayan Rane
Narayan Rane  sarkarnama
कोकण

नारायण राणे आज घेणार महत्वाचा निर्णय ; अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची (sindhudurg bank) निवडणुक नुकतीच झाली. या निवडणुकीत भाजपची सत्ता आली आहे. भाजपच्या सिद्धिविनायक पॅनलने ११ जागांवर विजय मिळवला. तर महाविकास आघाडीच्या पॅनेलला आठ जागांवर विजय मिळवता आला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज (गुरुवारी) जिल्हा बँकेच्या (sindhudurg bank election) ओरोस प्रधान कार्यालयात निवडणूक होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी बंदना खरमाळे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पड़ते, केंद्रीय मंत्री नारायण राणे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्या पॅनेलला बहुमत आहे. मात्र महाविकास आघाडी काय जादू करणार का, याकडे लक्ष लागले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल सतीश सावंत यांच्या, तर भाजपचे सिद्धिविनायक पॅनेल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली लढले होते.

विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव केल्यामुळे “जायंट किलर” ठरलेले कणकवलीचे विठ्ठल देसाई यांचे नाव चर्चेत आहे, तसेच संचालक मनिष दळवी हे तरुण आहेत व राणे यांचे निकट वर्तीय मानले जातात ,त्यामुळे नारायण राणे कोणाच्या नावाला पसंती देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

आज दुपारी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणुक अधिकाऱ्यांनी सांगितलं. यात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होणार आहे.

''निवडणुकीत कोणीही दगाफटका करू नये,'' असे बुधवारी झालेल्या भाजच्या जिल्ह्या कार्यकारिणीच्या बैठकीत दिला नारायण राणे यांनी कार्यक्रर्त्यांना सांगितले. नारायण राणे अध्यक्ष पदासाठीचे नाव जाहीर करणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण बसणार ? राणे कुणाचे नाव जाहीर करणार हे आज दुपारी स्पष्ट होईल. सावंतवाडी तालुक्यातील गजानन गावडे हे सुद्धा अध्यक्षपदाचे दावेदार मानले जात आहेत. गावडे यांनी यापूर्वी एकदा जिल्हा बँक अध्यक्षपद भूषविले आहे. व सध्या ते जिल्हा मजूर संस्था फेडरेशनचे अध्यक्ष आहेत.

जिल्हा बैंक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख व शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला चाकू हल्ला, व त्यानंतर झालेले आरोप प्रत्यारोप व नाट्यमय घडामोडी यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बैंक निवडणूकीत राणेंचे वर्चस्व आहे. निवडून आलेल्या संचालक मंडळात अतुल काळसेकर हे विद्यमान संचालक असल्याने त्यानां कामाचा अनुभव आहे.

लेखा परीक्षणातही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने अ दर्जा मिळविला. बँकेकडून सुमारे 40 टक्के शेतीकर्ज देण्यात आलेले आहे. 2292 कोटी ठेवी 20-21 मध्ये झालेल्या असून स्वनिधी 270 कोटींवर गेलेला आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षात 5000 कोटींची उलाढाल बँकेच्या माध्यमातून करण्याचे बँकेचे धोरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT