Sindhudurg district administration action Over Disaster Management And Election work  Sarkarnama
कोकण

Officers Suspension : सरकारी कामात हलगर्जीपणा अंगलट! प्रशासनाची धडक कारवाई, दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार

BDO And Education Officer Suspension : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन अधिकाऱ्यांवर सरकारी कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ठेवत थेट निलंबनाची शिफारस केली आहे.

Aslam Shanedivan

Sindhudurg Officers Suspension News : आपत्‍ती व्‍यवस्‍थापन व निवडणूक कामकाज हे दोन्‍ही विषय संवेदनशील व अतितात्‍काळ स्‍वरुपाचे असतानाही दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्‍य सावंत आणि मालवणचे विस्‍तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गट शिक्षणाधिकारी संजय माने यांनी शासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्याचे उघड झाले आहे.

यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे अजिंक्‍य सावंत, गटविकास अधिकारी, दोडामार्ग यांच्या निलंबनाची शिफारस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनीच केली आहे. या शिफारसीनंतर आता जिल्हा प्रशासनासह शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दोडामार्ग तालुक्यातील अतिवृष्टी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा केला. या दौर्‍यात त्यांनी दोडामार्ग तालुक्यातील मौजे वझरे गावात जाऊन झाडे पडून नुकसान झालेल्या सुमारे ३० घरांची पाहणी केली. त्यावेळी दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत हे गैरहजर होते.

तर याआधी २० एप्रिल २०२६ रोजी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कामांचा आढावा घेताना झाडे तोडणेबाबत संबंधित ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या होत्या. तर याबाबत पाठपुरावा करून कार्यवाही पूर्ण करून घेण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांना दिल्या होत्या.

पण आता या आदेशाकडे गटविकास अधिकारी अजिंक्‍य सावंत यांनी दुर्लक्ष करत कार्यवाही केलेली नसल्याचे समोर आले आहे. यावरून जिल्हा प्रशासनाने सावंत यांच्या निलंबनाची शिफारस शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.

तसेच दोडामार्ग तालुक्‍यातील विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) कार्यक्रमाच्या आढावा बैठकीस कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नसताना विस्‍तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गट शिक्षणाधिकारी संजय माने अनुपस्थित राहिले.

यावरून त्यांच्यावर निवडणूक कामकाजात कसूर केल्‍याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर संजय माने यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे शिफारस केलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT