BJP Win ZP and Panchayat Samiti Elections in Sindhudurg Sarkarnama
कोकण

nitesh rane : कमळ-धनुष्यबाणालाच तिजोरी, 'मशाल' दिसली तर..! निधीच कापणार; भर प्रचार सभेत भाजप मंत्र्याची धमकी

nitesh rane controversial statement zilla parishad election : तळकोकणातील सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तिजोरीच्या चाव्या पालकमंत्री म्हणून माझ्या ताब्यात आहेत. त्यामुळे निधी कमळ आणि धनुष्यबाणालाच मिळणार असून महायुतीचेच उमेदवार निवडून द्या असे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Aslam Shanedivan

  1. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात नितेश राणेंच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे.

  2. महायुतीच्या उमेदवारांनाच विकास निधी मिळेल, असा इशारा त्यांनी प्रचार सभेत दिला.

  3. या वक्तव्यामुळे तळकोकणासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Sindhudurg News : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून तळकोकणात देखील प्रचार सभांचा धुरळा उडाला आहे. अशाच एका प्रचार सभेत भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी केलेल्या विधानाने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांनी या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर राणे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचेच सगळेच उमेदवार जिंकले पाहिजेत. तरिही पालकमंत्री म्हणून तिजोरीच्या चाव्या माझ्या ताब्यात आहेत. विकासाचा निधी मीच देणार आहे. त्यामुळे निधी कमळ आणि धनुष्यबाणालाच मिळणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार कदाचित निवडून आलाच तर दिलेला निधी पण परत मागे घेणार. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या,असे आवाहन त्यांनी केले आहे. या विधानानंतर आता तळकोकणासह राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

नीतेश राणेंनी, या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर राणे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचे सगळेच उमेदवार जिंकले पाहिजेतय. तसे झाले तर आमच्या प्रत्येक गावाचा विकास होऊ शकतो. पण एवढ्या वर्षांनी जनतेने सत्ता देऊन ठाकरेंनी काय केलं. 2014 पासून ते 2024 पर्यंत ठाकरे सेनेकडेच सगळी सत्ता होती, खासदार होते, आमदार होते.

मग काय केलं जिल्ह्यासाठी? विकास आणला का? किती रोजगार दिला? असे प्रश्न करत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. तसेच आता जनतेला सगळ्या गोष्टी कळून चुकल्या आहे. यामुळेच महायुतीचे सगळे उमेदवार घासून नाही ठासून निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर निवडणुकीसाठी ठाकरेंना साधे हक्काचे उमेदवार पण मिळत नसल्याची खोचक टीका त्यांनी केली आहे.

तसेच त्यांनी विकासाचा निधी मीच देणार असून पालकमंत्री असल्याने तिजोरीच्या चाव्या या माझ्याच ताब्यात आहेत. निधी कमळ आणि धनुष्यबानलाच दिला जाईल. पण कदाचित ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आलाच तर दिलेला निधीही मागे घेणार. त्यामुळं महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या.

दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत सतीश सावंत यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत यांच्यासह समर्थकांच्या भाजप प्रवेशाने ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. सतीश सावंत यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात 2019 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.

FAQs :

1. नितेश राणेंनी नेमकं काय विधान केलं?
महायुतीचे उमेदवार निवडून आले तरच विकास निधी मिळेल, असे त्यांनी सांगितले.

2. हे विधान कुठे करण्यात आलं?
तळकोकणातील जिल्हा परिषद निवडणूक प्रचार सभेत हे विधान करण्यात आलं.

3. कोणत्या पक्षावर त्यांनी टीका केली?
ठाकरे गटाच्या शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला गेला.

4. या विधानावर प्रतिक्रिया काय आहेत?
राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा आणि विरोधकांकडून टीकेची शक्यता व्यक्त होत आहे.

5. या वादाचा निवडणुकीवर परिणाम होईल का?
या विधानामुळे प्रचार अधिक आक्रमक होण्याची आणि राजकीय तापमान वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT