Snehal Jagtap News
Snehal Jagtap News Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray News : 'येणाऱ्या निवडणुकीत महाडमध्ये ठाकरे गटाचाच आमदार निवडून येईल'

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray Mahad News : महाडच्या जनतेने शिवसेनेवर (Shivsena) प्रेम केले आहे. या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेव ठाकरे) पक्षाचाच आमदार निवडून येईल. आपल्याला अभिप्रेत असलेली शिवसेना पुन्हा उभी करणार, असा निर्धार स्नेहल जगताप यांनी व्यक्त केला.

महाडमधील चांदे क्रिडांगणावर उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. यावेळी स्नेहल जगताप, काँग्रेसचे (Congress) जिल्हा उपाध्यक्ष हनुमान जगताप व महाड मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी स्नेहल जगताप म्हणाला, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले. धारावी पॅर्टन जगभरात प्रसिद्ध झाला. मात्र, माझे वडिल कोरोनामध्येच सोडून गेले, ते रुग्णालयात असतानाही त्यांनी महाडकरांसाठी काम केले, असे स्नेहल जगताप म्हणाल्या.

महाडकरांनी आमच्या कुटुंबावर खुप प्रेम केले आहे. मतदारसंघातील लोकांनी ठरवून ठाकले आहे की ते फक्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत उभे आहेत. अजून खूप काम करायचे आहे, असेही जगताप यांनी सांगितले. नवीन सुरुवात करण्याची संधी आपण दिली आहे. त्यामुळे आता जिंकेपर्यंत लढणार आहे, असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, महाडचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawle) हे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर महाड मतदारसंघात ठाकरे गटाची कोंडी झाली होती. मात्र, जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे गोगावले यांच्यासमोर कडे आव्हान उभे राहणार आहे. या प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गोगावले यांची कोंडी जगताप यांच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

जो संघर्ष माणिक जगताप यांनी केला तसाच संघर्ष उद्धव ठाकरे करत आहेत. तीच प्रेरणा घेत प्रवाहा विरोधात जात आपण उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला असल्येचे स्नेहल जगताप यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी हेच माझे घर असल्याचे जगताप म्हणाला. भविष्यात सर्व आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT