Sunil Tatkare -Balasaheb Thorat  Sarkarnama
कोकण

कार्यकर्ते पळवापळवीवरुन सुनील तटकरे- बाळासाहेब थोरातांमध्ये टोलेबाजी

महाड नगरपरिषदेच्या (Mahad Nagar parishad) नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात तटकरे- थोरातांमध्ये शाब्दिक चकमकीमुळे सभागृहात हास्यकल्लोळ उठला होता.

सरकारनामा ब्युरो

रायगड : महाड नगरपरिषदेच्या (Mahad Nagar parishad) नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. १७) पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात (Dr. Babasaheb Ambedkar Hall) हा कार्यक्रम झाला. या सोहळ्यात खासदार सुनील तटकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील शाब्दिक चकमकींनी मात्र संपूर्ण सभागृहात हास्याचे कल्लोळ उठले होते. दोघांमध्येही एकमेकांवर कार्यकर्ते पळवापळवीवरुन जोरदार फटकेबाजी रंगली होती. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, '' आताच आमच्या सहकाऱ्यांचा सत्कार माझ्या हस्ते करण्यात आला ते आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. पण दिवंगत माजी आमदार माणिक जगताप (lManik Jagtap) यांनी कधी बाळासाहेबांना काँग्रेसवासी केले, हे कळलेच नाही. त्यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आमच्या मेहबूब कडवेकर यांचा सत्कार केला. त्यामुळे आता त्यांना काँग्रेसमध्ये नेणार की काय,'' असं म्हणताच संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.

आमदार तटकरे म्हणाले की, 'प्रत्येकाने आपापली फिल्डींग लावली आहे. निवडणुकीच काय ठरवायचं असेल ते ठरवा, माझी हरकत नाही. नाहीतरी मी काही केलं नाही तरी खापर माझ्या डोक्यावरचं फुटते, अशी जोरदारर फटकेबाजी तटकरे यांनी यावेळी केली.

तर दूसरीकडे, बाळासाहेब थोरात यांनी देखील सुनील तटकरेंच्या फटकेबाजीला तितक्याच सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिल्याने सभागृहातील वातावरण उत्साही झाले. बाळासाहेब थोरात म्हणाले, '' आम्ही तुमचा हा नगराध्यक्ष पळवला तो पळवला, तुमची माणसे इकडून तिकडे गेली हे जरी खरे असले तरी, मुळचे काँग्रेसचे असलेले सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसने पळवले त्याचं काय, असा प्रश्न उपस्थित करताच संपूर्ण सभागृहात पुन्हा हशा पिकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT