uddhav Thackeray| Uday Samant
uddhav Thackeray| Uday Samant Sarkarnama
कोकण

Ratnagiri Politics: ठाकरे गटाकडून कोकणात चाचपणी सुरु; उदय सामंताविरोधात तगडा उमेदवार उभा करणार...

सरकारनामा ब्युरो

Ratnagiri Politics : राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या गटाने कोकणात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणापासून या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याविरोधात उमेदवार शोधण्यासाठी ठाकरे गटाने हालचाली सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. उदय सामंत यांच्या रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांना विचारण्यात आल्याची माहिती आहे. पण, साळवी यांनी मात्र अद्याप रत्नागिरीमधून लढण्याबाबत कोणतेही उत्तर दिले नसल्याचे समोर आले आहे. (Thackeray group will field a strong candidate against Uday Samant in Konkan)

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हे देखील मूळचे रत्नागिरीचे आहेत.शिवसेनेच्या बांधणीसाठी साळवींचा दांडगा जनसंपर्क, त्यांचं काम, कार्यकर्ते या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. या सर्व शक्यता आणि राजकीय समीकरणांचा विचार करता उदय सामंत यांच्यासमोर राजन साळवी हे तगडं आव्हान उभं करु शकतात, असा कयास लावला जात आहे. त्यामुळे सध्या ठाकरे गट उदय सामंतांसमोर साळवींच आव्हान उभे करण्याच्या हालचाली सुरु झाल्याची चर्चा आहे.

तर दुसरीकडे गुहागरचे आमदार भास्कर जाधव हेदेखली रत्नागिरीतून लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाने सांगितल्यास रत्नागिरीतून लढेन अशी प्रतिक्रीया भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दिली होती. याशिवाय, भास्कर जाधव यांचा मुलगा आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधवला गुहागरमध्ये उमेदवारी मिळू शकते, असे सूचक वक्तव्यही केलं होतं. त्यामुळे आता कोकणातील विविध मतदारसंघ, समीकरणं आणि उमेदवार याबाबत मोर्चेबांधणी सुरु झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे भाजपने देखील कोकणात लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे आगामी राजकीय सारीपटावरच्या चालींना वेगळेत महत्त्व प्राप्त झाले आहे. (Kokan Politics)

शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासबोत जाणाऱ्या आमदारामंध्ये कोकणातील आमदाराची संख्या मोठी होती. खरं तर कोकण हा शिवसेनाचा बालेकिल्ला मानला जात होता. पण कोकणातील आमदारांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यामुळे आगामी निवडणुकामंध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे आव्हान राहणार आहे. सुरुवातीला राजन साळवी हेदेखील जाणार असल्याचे सांगितले जात होते. पण साळवी शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच राहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT