Ganesh Naik
Ganesh Naik Sarkarnama
कोकण

गणेश नाईक हे प्रतिष्ठित; दबाव आणू शकतात, असे म्हणत न्यायालयाने दिला दणका

सरकारनामा ब्यूरो

नवी मुंबई : माजी मंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांना बलात्कार आणि धमकी या गुन्ह्यांत दिलास देण्यास नकार दिला आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. नाईक हे प्रतिष्ठित राजकारणी असल्याने ते फिर्यादीवर दबाव आणू शकतात, अशी भीती न्यायालयाने व्यक्त करत त्यांना अटकपूर्व जामीन देणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. (Thane Court declines anticipatory bail application by Ganesh Naik)

नाईक यांच्या विरोधात बेलापूर आणि नेरूळ अशा दोन पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. बेलापूर पोलीस ठाण्यात शस्त्र दाखवून धमकावणे आणि नेरुळ पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. एकाच पिडितेने या दोन्ही फिर्यादी दिल्या आहेत.

दोन्ही पोलीस स्थानकांच्या तपास अधिकाऱ्यांनी गणेश नाईक यांच्या कोठडीची मागणी केली होती. बलात्कार प्रकरणात नाईक यांचे वैद्यकीय तपासणी करायची होती आणि शस्त्र दाखवण्याच्या प्रकरणात हत्यार जप्त करण्यासाठी त्यांची कोठडी आवश्यक असल्याचे मत सरकारी पक्षाने व्यक्त केले होते. ही केस मागे घ्यावी म्हणून फिर्यादींना दोन वेळा धमकी देण्यात आल्याची बाब नाईक यांच्या विरोधात गेली. त्यामुळेही न्यायालयाने नाईक यांची मागणी योग्य ठरविली नाही. एवढेच नाही तर सात दिवस तरी आम्हाला अटक करू नये अशी नाईक यांच्या वकिलाची मागणीही न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे नाईक यांना अटकेपासून बचाव करण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवाव्या लागणार आहेत.

याबाबत पिडितीने माध्यमांशी बोलताना या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पीएशी बोलण झाले आहे, असे सांगितले. राष्टवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगत मला न्याय पाहिजे. माझा मुलाला नाईक यांचे नाव पाहिजे, अशी मागणी केली.

गणेश नाईक हे या महिलेशी २७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशीप होते. या संबंधातून महिलेला एक मुलगा झाला. या मुलाला गणेश नाइकांनी स्वीकारण्यास नकार दिला. मार्च २०२१ मध्ये आमदार गणेश नाइकांनी मला सीबीडी रेतीबंदर येथील लखानी टॉवर्ससमोरील इमारतीत बोलावून घेतले. तिथे मी मुलाला त्यांचे नाव देण्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी माझ्यासमोर बंदूक ठेवून त्रास देऊ नको, असे सांगत ‘तू शांत राहिली नाहीस, तर मी स्वतःलाही संपवेन आणि तुम्हा दोघांनाही संपवेन’, अशी धमकी दिल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT