Shashikant Warise
Shashikant Warise  Sarkarnama
कोकण

Shashikant Warise : 'तो पूर्वनियोजित कटच'; पत्रकार वारीसे हत्या प्रकरणातील आरोपीची कबुली

सरकारनामा ब्युरो

Shashikant Warise news Update: पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या अपघात हा पूर्वनियोजित कट असल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती समोर आहे. गेल्या आठवड्यात राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. पण हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत तेथील स्थानिकांनी या प्रकरणाची  एसआयटी मार्फेत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची एसआयची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ('That premeditated plot'; Confession of the accused in the journalist Warise murder case)

शशिकांत वारीसे यांच्या मृत्यू प्रकरणी संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी पंढरीनाथ आंबेरकर या रिफायनरी समर्थक व्यक्तीला अटक केली होती. आता आंबेकर यानेच हा अपघात नसुन पूर्वनियोजित कट असल्याचे कबुल केलं आहे.

वारीसे यांचा ६ फेब्रुवारीला अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वारीसे यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, ७ फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे. पण, हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर गंभीर आरोप केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT