Barsu Refinery Project Protest: रत्नागिरीतील रिफायनरी सर्वेक्षणाविरोधातील आंदोलन पेटले आहे. रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना राजापूरमध्ये अटक करण्यात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. वैभव कोळवणकरांसह त्यांच्या दोन सहकाऱ्यांनाही ताब्यात घेतले असून तिघानांही रत्नागिरीमध्ये ठेवण्यात आले आहे. (movement of Barsu Refinery ignited; 1800 policemen deployed for survey along with CRPF)
राज्य सरकारने रत्नागिरीतील बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाच्या (Barsu Refinery Project) सर्वेक्षणाची घोषणा केली. तेव्हापासून इथल्या ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध आहे.या प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी सर्वेक्षणाच्या जागेवर ठिय्या आंदोलन सुरु केले. राजापूर तालुक्यातील तहसिलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनीही स्थानिकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण प्रकल्प हद्दपार होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलक ग्रामस्थांनी घेतली आहे.
पण दुसरीकडे, प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी शेकडो अधिकारी आणि 1800 पोलीस कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे.इतकेच नव्हे तर,एसआरपीएफ'च्या तीन तुकड्या देखील आज रत्नागिरीत दाखल होणार आहेत. रत्नागिरीसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून अधिक पोलिसांचे पथके बोलवण्यात आली आहेत.पोलिसांच्या चोख बंदोबस्तात रिफायनरीचे ड्रोन सर्वेक्षण व माती परीक्षण केले जाईल. (Ratnagiri News)
गेल्या दोन वर्षांपासून आम्ही या प्रकल्पाला विरोध करत आहोत. पण तरीही राज्य सरकार या प्रकल्पासाठी प्रयत्न करत आहे.खासदार विनायक राऊतांनी या संदर्भात स्थानिकांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. पण आजपर्यंत एकदाही त्यांनी आमची भेट घेतलेली नाही, अशी खंत एका ग्रामस्थाने व्यक्त केली. इतकेच नव्हे तर, आम्हांला ही जमीन कसण्यासाठी हवी. यातून आम्हाला नोकऱ्या मिळाल्या तरी हा प्रकल्प नकोय, आमची मुलं कमवून खातील, असही आंदोलक महिलांनी म्हटलं आहे. (Maharashtra Politics)
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.