ShivSena
ShivSena  Sarkarnama
कोकण

ऐकावे ते नवलच! बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलीचे नाव ठेवले 'शिवसेना'

सरकारनामा ब्यूरो

Shiv Sena News : रायगड जिल्ह्यातील महाडच्या एका शिवसैनिकाने आपल्या नेत्याप्रति अनोखी निष्ठा दाखवली आहे. या शिवसैनिकाने आपल्या मुलीचं नाव 'शिवसेना' असं ठेवलं आहे. त्यामुळे या निष्ठेची राज्यात एकच चर्चा रंगली आहे. पांडुरंग वाडकर (Pandurang Wadkar) असं या शिवसैनिकाचं नाव आहे. तसेच त्यांच्याकडे उपसरपंच हे पददेखील आहे. वाडकर हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर कार्यकर्त्ये आहेत.

17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन होता. त्यानिमित्त वाडकर यांनी आपल्या मुलीचे नामकरण करत 'शिवसेना' असे नाव ठेवले. त्यांच्या या चिमुकलीच्या नामकरण सोहळ्याला मोठी गर्दीही जमली होती. या चिमुकलीचा जन्म १७ आक्टोबरला झाला होता. तर मुलगी जन्माला यायच्या आदल्या दिवशी बाळासाहेब ठाकरे हे माझ्या स्वप्नात आले होते, असं पांडुरंग वाडकर यांनी सांगितलं.

खरं तर शिवसेनेत सध्या दोन गट पडले आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा एक गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एक गट. त्यामुळे खरी शिवसेना नेमकं कोणाची हा वाद निवडणूक आयोग आणि कोर्टासमोर आहे. असे असले तरीही या शिवसैनिकाने आपल्या मुलीचे नाव 'शिवसेना' ठेवत आपल्या पक्षाप्रती निष्ठा दाखवल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मुलीचं नाव 'शिवसेना' असं का ठेवलं? :

महाड तालुक्यातील एका उपसरपंचाने आपल्या मुलीचे नाव 'शिवसेना' असे ठेवले आहे. त्यांनी ठेवलेल्या या नावाची राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे. पांडुरंग वाडकर असं त्यांचं नाव असून ते महाडच्या किये-गोठवलीचे आहेत. पांडुरंग वाडकर हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर कार्यकर्त्ये आहेत. शनिवारी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन होता. त्यानिमित्त वाडकर यांनी आपल्या चिमुकलीचे नाव 'शिवसेना' असे ठेवले. तर बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलीचे नाव 'शिवसेना' (Shiv Sena) ठेवले असल्याचं ते सांगतात. त्यांनी ठेवलेल्या या नावामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT