CM Uddhav Thackeray and Eknath Shinde
CM Uddhav Thackeray and Eknath Shinde Sarkarnama
कोकण

मनसेच्या माजी नगरसेवकांच्या स्वागतासाठी खुद्द मुख्यमंत्री ठाकरे उपस्थित

Yogesh Kute

मुंबई :- मनसेच्या (MNS) कल्याण- डोंबिवलीमधील दोन माजी नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देण्याच्या निमित्ताने शिवसेनेने (Shivsena) मनसेला जोरदार धक्का दिला आहे. मनसेचे माजी नगरसेवक पूजा पाटील (Pooja Patil) आणि प्रकाश माने (Prakash Mane) यांचा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. (Uddhav Thackeray Latest news)

या प्रवेशाची सर्वाधिक झळ ही मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांना बसणार आहे. या प्रवेशावरून दोन्ही पक्षांत वाकयुद्ध रंगले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून सध्या शिवसेनेला लक्ष्य केले आहे. मात्र सेनेने आता मनसेचे शिलेदार फोडण्याचे काम हाती घेतले आहे. पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे हे नाराज असल्याच्या चर्चेनंतर खुद्द ठाकरे यांनी त्यांना सेनेत येण्याचे निमंत्रण दिले होते. आगामी काही महिन्यांत महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याने सेनेनेही कंबर कसल्याचे आजच्या पक्षप्रवेशावरून दिसते.

मुख्यमंत्र्यांच्या `वर्षा` या निवासस्थानी पूजा पाटील आणि प्रकाश माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेचे कल्याण तालुका प्रमुख गजानन पाटील,सुभाष पाटील, भास्कर गांगुर्डे, प्रवीण परदेशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी देखील हातात भगवा झेंडा आणि मनगटावर शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सगळ्यांना शुभेच्छा देत भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे हेदेखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री शिंदे यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत करताना 'शिवसेनेच्या वतीने कल्याण डोंबिवली मध्ये सुरू असलेल्या विकासकामांना मिळलेली ही पावती असल्याचे सांगितले, कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून शहरात सुरू असलेली विकासकामे पाहता अशी विकासकामे आपल्या विभागात देखील व्हावी या इच्छेने अनेक जण शिवसेनेशी जोडले जात असल्याचे सांगितले. हे सर्वजण स्वतःहून आम्हाला पक्षात घ्या असे सांगून आले असल्याने त्यासाठी मुद्दाम प्रयत्न करून कुणाला पक्षात आणलेले नाही' असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.

कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना 'कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या अनेक विकासकामे सुरू असून या विकासाचा भाग होण्याची इच्छा सगळ्यांनाच असते, याच भावनेतून आपल्या विभागाचा देखील अशाच पद्धतीने सुनियोजितपणे विकास व्हावा या दृष्टिकोनातून आज या दोन्ही माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सांगितले. यापूर्वी देखील राजेश कदम, सागर जेधे, अर्जुन पाटील हे मनसेमधून भाजपमध्ये आले आहेत, तर भाजपमधून महेश पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये दाखल झाले होते. येणाऱ्या काळात ही संख्या अधिक वाढत जाईल' असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT