Kiran Samant News Sarkarnama
कोकण

Kiran Samant News : उदय सामंत यांच्या भावाच्या 'मशाली'वरून शिंदे गटात 'आग'; 'जो भी हो देखा जायेगा', उदय सामंताच्या करिअरमुळे माघार...

Konkan Politics ; मशाल चिन्ह व उद्धव ठाकरेंचा उल्लेख असलेला फोटो स्टेटसवर ठेवत त्यांनी राजकीय धुराळा उडवून दिला आहे.

Mangesh Mahale

Sindhudurg : सोळा आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणींचा मुद्दा चर्चेत असताना शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांच्या भावाच्या व्हाॅटस्अॅप स्टेटसने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदेंना हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मंत्री सामंत यांचे मोठे बंधू किरण यांनी 'जो भी हो देखा जायेगा' असा मजकूर असलेला, मशाल चिन्ह व उद्धव ठाकरेंचा उल्लेख असलेला फोटो स्टेटसवर ठेवत राजकीय धुराळा उडवून दिला आहे.

किरण सामंतानी आपले स्टेटस डिलीट केले आहे. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे."मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून मी ते स्टेटस मागे घेतले. या स्टेटस ठेवण्यामागे काही कारणे होती. त्यावर मी योग्यवेळी बोलेन," असे त्यांनी स्पष्ट केले आहे. समाजमाध्यमांवर त्यांच्या स्टेटसची चर्चा सुरू आहे. नेटकऱ्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा करीत ठाकरे गटात गेल्यावर लोकसभेची निवडणूक लढतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

"मी ते स्टेटस केवळ उदय सामंत यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून मागे घेतले. माझ्यामुळे उदयचे करिअर खराब होऊ नये, त्यासाठी मी माघार घेतली. माझी सर्व गोष्टींना सामोरे जाण्याची तयारी होती. स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून या प्रवृत्तीच्या लोकांनी सावध राहावे. त्यांच्या नो बॉलला मी फ्री हिट देणार म्हणजे देणार," असे ते म्हणाले.

कोण आहेत किरण सामंत...

किरण सामंत हे मंत्री उदय यांचे मोठे बंधू आहेत. ते व्यावसायिक आहेत. दोघांनी एकाच वेळी राजकारणात प्रवेश केला आहे. किरण यांची लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. पण भाजपने सिंधुदुर्ग -रत्नागिरी लोकसभा मतदार लढवण्याचा आग्रह धरल्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे ते वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. उदय सामंत यांच्या राजकीय प्रवासात किरण यांचा मोठा वाटा आहे. किरण सामंत हे सध्या सिंधुरत्न योजनेच्या सदस्य आहेत.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT