Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पालकमंत्री तथा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी शिवसेना पक्ष बांधणीकडे विशेष लक्ष दिलं आहे. ऑपरेश टायगरमधून अनेक नेत्यांचा त्यांनी पक्ष प्रवेश घडवून आणला आहे. यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम यांनाच गळ घातली आहे. ज्याची जिल्ह्यासह राज्यात जोरादर चर्चा झाली. पण आता या प्रवेशाच्या दुसऱ्या अध्यायाला सुरूवात झाली असून रमेश कदम यांनी रामदास कदम यांची भेट घेतली आहे. यामुळे आता रत्नागिरीत 'कदम-कदम बढाये जा'चा नारा घुंमणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
सामंत यांनी चिपळून येथे कदम कुलवृत्तांत या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा मुहूर्त साधत रमेश कदम यांना शिवसेनेची ऑफर दिली. तर जिल्ह्यात असणारी महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकण्याचा डाव टाकला. पण कदम यांनी 1 महिना थांबा उत्तर मिळेल म्हणून वेळ मारून नेली होती. यानंतर याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
महिना थांबा असे म्हणणाऱ्या कदमांनी जामगे येथे जाऊन श्री कोटेश्वरी मानाई देवीच्या उत्सवात हजेरी लावली. फक्त हजेरीच लावली नाही. तर थेट माजी मंत्री रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली. यामुळे सामंत यांनी कदम यांच्यात कार्यक्रमात तर कदम यांनी श्री कोटेश्वरी मानाई देवीच्या उत्सवात वेळ साधला आहे.
याआधी रामदार कदम यांनी 'कदम-कदम बढाये जा'चा नारा देत कदम कुलसंमेलनाची सुरूवात केली होती. त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणात जेवढे कदम आहेत. त्यांना एकत्र आणण्याचे काम केलं होतं. ते आजही त्यांच्या संपर्कात आहेत. जे आज शिवसेनेत (शिंदे) आहेत.
विभानसभेनंतर रामदार कदम यांनी रणनीती आखत विरोधक संपवण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यांनी आधी दापोलीतील एकमेक विरोधक माजी आमदार संजय कदम यांचा पक्षप्रवेश घडवून आणला. त्यापाठोपाठ चिपळूणच्या जिल्हाध्यक्षाने देखील राजीनामा दिला असून ते सध्या कोठेच सक्रीय नाहीत. यामुळे आता दापोली मतदार संघात त्यांचा कुणीच विरोधक शिल्लक राहिलेला नाही. तर आता रमेश कदम देखील शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या आहेत. याची फायनल तयारी जामगे येथील श्री कोटेश्वरी मानाई देवीच्या उत्सवात झाल्याचेही बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.