Uday Samant vs Nitesh Rane Sarkarnama
कोकण

Bhagwa Shawl Controversy : तळ कोकणात पुन्हा राणे विरुद्ध सामंत! 'काही जण भगव्या शाली फॅशन म्हणून...' उदय सामंतांचा टोला

Uday Samant vs Nitesh Rane: तळ कोकणातील रत्नागिरीत सध्या उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि भाजप नेते मंत्री नितेश राणे यांच्यात जोरदार जुंपली आहे.

Aslam Shanedivan

Summary :

  1. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथे भाजप आणि शिवसेनेत शितयुद्ध पेटल्याची स्थिती आहे.

  2. मंत्री उदय सामंत यांनी “काही जण भगव्या शालीत मिरवतात” अशा शब्दांत अप्रत्यक्ष डिवचले.

  3. सामंतांचा रोख नितेश राणेकडे असल्याची चर्चा सुरू असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Ratnagiri News: तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा असो किंवा रत्नागिरी येथे महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये शितयुद्ध सुरू झाल्याची स्थिती आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही सध्या वादाची ठिणगी पडली असून मंत्री उदय सामंत आणि मंत्री नितेश राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

अशातच राजापूर एका गोष्टीवरून नितेश राणे आणि उदय सामंत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. ही वास्तू मशीद असल्याचे लोक म्हणत असून हिंदुत्ववादी संघटनांनी मात्र ते सूर्यमंदिर असल्याचा दावा केला आहे. यावरूनच हा वाद सुरू झाला.

कोकणातील महायुतीच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून धुसफूस सुरू आहे. एकमेंकाचा शब्द खाली पडायच्या आधीच उत्तर दिले जात आहे. यामुळे कोकणात महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे. तर गेल्या काही दिवसापासून राणे यांचे भगवी शाल असलेले अनेक फोटो व्हायरल होत असल्याचे समोर येत आहे. यावरूनच येथे दोघांमध्येच आता शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

सामंत यांनी भगव्या शालीवरून, काही जण सध्या भगव्या शाली घालून मिरवतात, ते फॅशन म्हणून त्या घालतात असा टोला लगावला होता. तर या वक्तव्यानंतर सामंतांचा रोख नेमका कुणाकडे? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान सामंत यांनी, आपणही भगव्या शाली मागवल्या असून आता घालून फिरण्याचा प्रयत्न करणार असल्याचा टोला देखील राणे यांना लगावला.

या सुरू असलेल्या वादावरून नितेश राणे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी देखील सामंतांना जोरादर प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्याकडे भरपूर भगव्या शाली आहेत, सामंतांना हव्या असतील तर नक्की देऊ, असा घणाघात राणेंनी केला आहे.

वाद नेमका काय आहे?

राजापूरच्या वरची पेठ येथे एक इमारत असून तेथे मुस्लिम समाजाकडून ताबूत बसवण्यात येते. येथे अनेक वर्षापासून मुस्लिम समाज सण साजरा करतात. मात्र काही हिंदुत्ववादी संघटनांचा मात्र ती इमारत हिंदूंचं सूर्य मंदिर असल्याचा दावा करत आहेत. यावरूनच हा वाद सुरू झाला आहे. तर यावरून काही दिवसांपूर्वी राजापूरमध्ये नितेश राणे आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एका मीटिंगचं आयोजन केलं होतं.

मात्र त्याला नितेश राणे गेले नाहीत. पण नाणीजचे नरेंद्र महाराज उपस्थित होते. याचट बैठकीत हिंदुत्ववादी संघटनांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यावरूनच सामंत यांनी नाव न घेता नितेश राणे यांना टोला लगावला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भगव्या शालीवरून सामंत आणि राणे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

FAQs :

प्रश्न 1: रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीत काय घडले?
उत्तर: मंत्री उदय सामंत आणि मंत्री नितेश राणे यांच्यात वाद पेटला आहे.

प्रश्न 2: उदय सामंतांनी नितेश राणेंवर काय वक्तव्य केले?
उत्तर: त्यांनी “काही जण भगव्या शालीत मिरवतात” असे वक्तव्य करून अप्रत्यक्ष टीका केली.

प्रश्न 3: या वादाचा परिणाम काय होऊ शकतो?
उत्तर: महायुतीतील तणाव उघड झाला असून कोकणातील राजकारण आणखी तापू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT