Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray : 'भ्रष्टाचारी अभय योजना' ही मोदी गॅरंटी; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

BJP Politics : अटलबिहारी वाजपेयी यांचा भारतीय जनता पक्ष होता, आता हा सगळा भाडोत्री पक्ष आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri Political News : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने अनेक योजना सुरू आहेत. तशी त्यांनी आता अजून एक योजना काढली आहे. 'भ्रष्टाचारी अभय योजना'! ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनी भाजपमध्ये यावे. आम्ही तुम्हाला अभय देतो, ही 'मोदी गॅरंटी' आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री, शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह भाजपवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर येथे आयोजित सभेत बोलत होते. या वेळी त्यांनी भाजप आणि भाजप नेत्यांवर कडक शब्दांत वार केले. नाव रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी पण त्यामध्ये शिव्या घालायला शिकवतात का? अटलबिहारी वाजपेयी यांचा भारतीय जनता पक्ष होता, आता हा सगळा भाडोत्री पक्ष आहे. यांच्याकडे नेते, कार्यकर्ते नाहीत, म्हणून आजूबाजूचे नेते आणत आहेत, असा टोला ठाकरेंनी लगावला. यानंतर भाडोत्री म्हणा किंवा भाडखाऊ म्हणा, अशा शब्दांत ठाकरेंनी भाजपला झोडपूण काढले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आमदार भास्कर जाधवांनी (Bhaskar Jadhav) पक्षात काम करूनही आम्ही पक्ष सोडला नाही, असे म्हणाले होते. यावर भास्करराव, तुम्ही घाबरू नका. तुमच्या मागे आम्ही आहोत, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी दिला. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खासदार विनायक राऊत यांना निवडून दिले नसते तर आज संपूर्ण कोकणात गुंडागर्दी झाली असती, असे म्हणत ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नीलेश राणे यांचा समाचार घेतला.

सजा सुनावणारे तुम्हीच, न्याय देणारेही तुम्हीच, आरोप करणारे पण तुम्हीच मग आम्ही काय करायचे? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांचे कौतुक केले. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश चंद्रचूड यांच्यासारखे काही लोक आहेत म्हणून ही लोकशाहीची शेवटची धाकधूक सुरू आहे. चारशे पारचा नारा देत देशाची घटना बदलून हुकूमशाही आणण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोपही ठाकरेंनी केला.

या वेळी व्यासपीठावर माजी खासदार अनंत गिते, आमदार भास्कर जाधव, माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT