Uddhav Thackeray Vs Uday Samant Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray Vs Uday Samant : 'शिवसेनेत आलातच 2014 ला अन् म्हणे..' ; उद्धव ठाकरेंकडून उदय सामंत लक्ष्य!

Uddhav Thackeray Ratnagiri Speech : हे 'रामराज्य' नाही 'मराराज्य' आहे, असं म्हणत आमदाराच्या गोळीबाराच्या घटनेवरून सरकारवर टीकाही केली.

Mayur Ratnaparkhe

Ratnagiri News : उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपावरती जोरदार टीका तर केलीच, शिवाय उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही लक्ष्य केले. 'तुम्ही शिवसेनेमध्ये आलातच 2014 ला आणि म्हणे हे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालले आहेत. बाळासाहेब होते तेव्हा तुम्ही आमच्या विरुद्ध आमच्याशी लढत होता. त्यानंतर लाचारी करून तुम्ही आमच्याकडे आला होता.' अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर केली आहे.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले, '2014मध्ये शिवसेनेत आले आणि हे खर आहे की मी त्यांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता. मी माझा शब्द पाळला पण ज्यांनी मला शब्द दिला ते शब्दाला कमी पडले. 2019 मध्येही त्यांना मंत्रिपद देण्याची तशी गरज नव्हती कारण मी 2014 साली मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. पण आम्ही बाळासाहेबांचे पुत्र शब्दाचे पक्के त्यांना बोलावून सांगितलं, शब्द दिला होता तुम्ही विसरला असाल मी नाही विसरलो. 2019 मध्ये मी सांगितले जा आणि मंत्रीपदाची शपथ घ्या आणि त्यांनी घेतली आणि ते पळाले.

त्या गद्दाराचं करायचं काय म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता खाली डोकं वर पाय पण ज्याला डोकंच नाही आणि त्याचे डोकं कुठलं पाय कुठले हेच कळत नाही, त्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. बिनडोक माणसाचं करायचं काय हा प्रश्न आहे.' अशा शब्दात ठाकरे यांनी सामंत यांच्यावरती टीका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर 'या नतदृष्टांनी बाळासाहेबांच्या फोटोची व खुर्चीची किंमत लावली आहे. पण त्या खुर्चीत जेव्हा बाळासाहेब होते आणि त्यांनी मोदींना वाचवले आणि म्हणून आज पंतप्रधान पदाची खुर्ची मोदींना मिळाली. बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना जाऊन विचारा आणि मोदींना जर जाण असेल, तर त्या खुर्चीची किंमत मोदी सांगतील. कारण त्या खुर्चीची किंमतच होऊ शकत नाही. ' असंही ठाकरे म्हणाले.

'अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते आणि जे काही त्यावेळेला गुजरातमध्ये घडले होते किंवा घडवले गेले होते. त्या वेळी वाजपेयींनी सांगितलं होतं की राजधर्म का पालन करना होगा, तेव्हा वाजपेयी यांना हे मान्य नव्हतं. त्यावेळी वाजपेयी मोदींना(PM Modi) काढून, फेकून द्यायला निघाले होते आणि त्या वेळेला याच खुर्चीत बसलेल्या बाळासाहेबांनी अडवाणींना सांगितलं होतं की मोदी गया तो गुजरात गया आणि त्या खुर्चीची तुम्ही किंमत करताय?' अशा तिखट शब्दात ठाकरे यांनी टीका केली.

तसेच, 'भर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन भाजपाचा आमदार गोळीबार करतोय हे रामराज्य नाही मरा राज्य आहे. आमच्या राजन साळवी यांच्या घरात जाऊन तुम्ही बाळासाहेबांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत करताय पण ज्यांनी ही किंमत केली त्यालाही त्याची लायकी दाखवू. पण ज्यांनी हे आदेश दिले त्यांनाही त्यांची लायकी काय आहे हे आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही.', असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT