Uddhav Thackeray  Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray Sabha ....हा तर चुना लगाव आयोग : उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर जोरदार बरसले

निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही.

Vijaykumar Dudhale

रत्नागिरी : निवडणूक आयुक्तांना मला सांगायचं आहे की, तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर कोणती शिवसेना खरी आहे, ते बघायला या. हा चुना लगाव आयोग आहे. ते सत्तेचे गुलाम आहेत, वरून येणाऱ्या हुकुमाप्रमाणे वागणारे आहेत. हे निवडणूक आयुक्त म्हणून राहायच्या लायकीचे नाहीत. कारण, शिवसेनेचा निर्णय ज्या तत्वावर केला आहे, ते तत्वच मुळात झूठ आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. (Uddhav Thackeray criticizes the Central Election Commission)

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत होते. ते म्हणाले की, निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केलेली नाही. तर माझ्या वडिलांनी केलेली आहे. त्यांचे वडील वर बसलेले असतील. ते तुमचे वडिल असतील, माझे वडिल नाहीत. आम्ही शिवसेनाच म्हणणार कारण, निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. तुम्ही शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर तुम्ही मराठी माणसाची एकजूठ फोडण्याचा प्रयत्न करत आहात.

मी माझ्या समोर बसलेल्या देवमाणसांचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. आजपर्यंत जे जे शक्य आहे, ते त्यांना दिले. ते आज खोक्यामध्ये बंद झाले आहेत. आज मी तुमच्याकडे तुमचे आशीर्वाद, साथसोबत मागायला आलो आहे. ते भुरटे, चोर, गद्दार आहेत,त्यांना सांगायाचे आहे की, शिवसेना तुम्ही चोरू शकत नाही. धनुष्यबाण तुम्हाला पेलवणार नाही. जिथं रावण उथाणा पडला, त्या ठिकाणी मिंद्दे काय पेलवणार, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजपला गल्लीतील कुत्रंही विचारत नव्हतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे राहिले नसते तर आज हे कुठे दिसले असते. ते आज निर्घृण आणि निष्ठूरपणे वागत आहे. ज्यांनी सोबत दिली, त्यांना संपवा. बघा प्रयत्न करून. संजय कदम आज शिवसेनेत आले आहेत. तुम्ही तर कायम सोबत असता, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

मैदानाची नावही चांगलं आहे, गोळीबार मैदान. पण शिवसेनाप्रमुख म्हणायचे, ढेकणांना चिरडायला तोफेची गरज नाही. ढेकणं अशीच चिरडायची असतात. ही ढेकणं आपलं रक्त पिऊन फुगलेली आहेत. त्यांना चिरडायची ताकद तुमच्या एका बोटात आहे. मतदानाच्या दिवशी तुम्ही ते चिरडून टाका, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT