Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray News  Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray News : उद्या दिवस फिरल्यानंतर त्यांच्या घरादारांची काय हालत होईल; ठाकरेंचा इशारा

सरकारनामा ब्यूरो

Konkan News : "कान्होजी जेधे कोण आणि खंडोजी खोपडे कोण? हे ओळखण्याची हीच वेळ आहे. आज खंडोजी खोपडेचे वंशज माजले आहेत. अनेक खान आले आहेत. येऊ द्या, कितीही खान आले तरी फरक पडत नाही. वैभव नाईक आणि राजन साळवी यांची संपत्ती किती आहे. मग तो तो जागतिक घोटाळा झाला, त्याचे काय?" असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.

खेडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, राजन आज ते तुमच्या घरावर आलेले आहेत. पण उद्या दिवस फिरल्यानंतर त्यांच्या घरादाराची काय हालत होईल, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. 'जाणता राजाचा' चित्रपट एकदा पहाच," असेही ठाकरे म्हणाले.

या वेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार टीका केली. "मेघालयात जाऊन संगमा यांच्यावर टीका केली. संगमा यांच्यावर टीका केली, आता त्यांच्यासोबत जाऊन सत्ता स्थापन केली. अमित शाह पुण्यात येवून बोलले होते, की उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटले, मग आता तुम्ही संगमांसोबत काय करत आहात?" असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला.

निवडणूक आयोगाने चोंबडेपणा करायचा नाही. तुमच्या परवानगीने शिवसेना स्थापन झालेली नाही. मुंबईत आशीर्वाद यात्रा काढत आहेत, त्यांना तुम्ही आशीर्वाद देणार आहात का? धणुष्यबाण हातात घेतला, पण कपाळावर जो गद्दारीचा शिक्का आहे, तो कसा पुसणार? काय चूक केली होती, कोरोनात चांगले काम केले, ही चूक होती का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

"कपिल सिब्बल यांनी चांगला मुद्दा हाताळला आहे. त्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे. तेही अस्वस्थ आहेत. देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, कारण स्वातंत्र्यासाठी ज्यांनी काहीच केले नाही, ते गादीवर बसले आहेत. भारत मातेसाठी सुर्वे यांचे सारखे सैनिक लढत असतात. गोमूत्र शिंपडून स्वातंत्र मिळत नाही. भाजपला काय वाटल शिंपडले गोमूत्र आणि झालो स्वातंत्र. अनेक क्रांतीकारक असे आहेत, त्यांची नावे सुद्धा आपल्याला माहित नाही," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

हा वडिलांसारखा तो वडिलांसारखा, स्वत: मध्ये कर्तृत्व नाही, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. चोरांना मत देणार का? धणुष्यबाण चोरला तर तुम्ही समोर या, मी समोर येतो, महाराष्ट्र जो निर्णय घेईल, तो मला मान्य आहे. लोकांनी सांगितले की घरी जा तर मी घरी जाईल, पण निवडणूक आयुक्त सांगेल तर मी त्यांना घरी पाठवेन, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

मी माझ्या देशाला पुन्हा गुलामगीरीच्या जोखडात अखडू देणार नाही, अशी शपथ घ्या. काहींचा जन्मच शिमग्यात झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेणार आहोत, असेही ठाकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT