Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray News : दिल्लीपुढे झुकणाऱ्यांना सपाट करा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात

Uddhav Thackeray Criticize CM Eknath Shinde : रायगडमधील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Sachin Waghmare

Raigad News : रायगडचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राजधानी म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे येथील मातीत इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत. येथील राजकर्ते कधीच दिल्लीपुढे झुकले नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जे गद्दार सत्तेत आले आहेत, त्यांना संपविण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे येत्या काळात दिल्लीपुढे झुकणाऱ्यांना सपाट करा, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविला.

रायगडमधील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इंडिया आघाडीतील ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्रित आले होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इंडिया आघाडीतील नेते मंडळी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर कडाडून टीका केली. काही नेतेमंडळी एका पक्षाकडून निवडून येतात. त्यानंतर केलेले काही तरी झाकण्यासाठी दुसऱ्या पक्षात जातात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जे गद्दार आहेत, त्यांना संपविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे अशा गद्दारांना ओळखून वेळीच घरी बसवा, असे आवाहन या वेळी ठाकरे यांनी केले आहे.

केंद्रातील मोदी सरकारने इंडिया आघाडी देशभर एकत्रित आल्याने त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, आम्ही सर्वजण एकसंध आहोत. त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही. लवकरच आता देशभरात सर्वत्र इंडिया आघाडीची बैठक होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT