Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Shivsena UBT crisis : ठाकरेंना रामराम ठोकलेला शिलेदार कमळ हाती घेणार? भाजप नेत्यासोबत फोटो समोर आल्याने राजकीय उलथापालथ

BJP MLA Nitesh Rane Politics : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर तळ कोकणातील राजकारणात उलथापालथ झाली असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

Aslam Shanedivan

  1. उबाठा शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

  2. सत्तेच्या प्रवाहात जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत.

  3. भाजप आमदार नितेश राणेंसोबतचे फोटो समोर आल्यानंतर राजकीय तर्क-वितर्कांना वेग आला आहे.

Sindhudurg Politics : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्गच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. नुकताच शिवसेनेला रामराम ठोकत राजीनामा देणारे सतीश सावंत आणि भाजपमध्ये जवळीक वाढल्याचे दिसून आले आहे. सावंत आणि भाजप आमदार नितेश राणे यांचे चर्चा करणारे फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर सावंत भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत ठाकरेंना जोरदार धक्का दिला होता. त्यांनी पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्याकडे राजीनामा पाठवत जिल्ह्यातील शेती, सहकार विषयक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले होते.

हे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेच्या प्रवाहात जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले होते. तर बुधवारपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ. आपण जो काही निर्णय घेईन त्याबाबत मतदारसंघातीलच नव्हे तर जिल्ह्यातील आपले कार्यकर्ते सोबत असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या.

अशातच भिरवंडे येथील श्री रामेश्वर मंदिरात त्यांची उपस्थिती भाजप मंत्री नितेश राणेंसोबत दिसली. या उपस्थितीमुळे आता तर्क-वितर्कांना वाव मिळत आहे. याआधी अशा पद्धतीने नितेश राणे अनेकदा दर्शनासाठी रामेश्वर मंदिरात गेले आहेत. सतीश सावंत यांनी त्यांचे कधीच स्वागत किंवा सत्कार केला नाही. हे काम गोट्या सावंत करत.

पण शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा देतानाच सतीश सावंत स्वतः नितेश राणेंसोबत दिसले. आता त्यांचे चर्चा करणारे फोटो समोर येत असल्याने कणकवलीतील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान उबाठातून ते बाहेर पडल्यानंतर नेमके कुठे जाणार, कोणती राजकीय भूमिका घेणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यांनी आपण लवकरच आपला राजकीय निर्णय घेऊ असे म्हटले होते. त्यानंतर आता त्यांचे राणेंबरोबर फोटो व्हायरल झाल्याने सावंत पुन्हा राणेंच्या चमूमध्ये सामील होतील अशी चर्चा जोर धरू लागल्या आहेत. तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडी भाजपसाठी महत्वाच्या ठरणार आहेत.

FAQs :

Q1. सतीश सावंत यांनी राजीनामा कोणाकडे दिला आहे?
👉 त्यांनी उबाठा शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे.

Q2. राजीनाम्याचे कारण काय सांगण्यात आले आहे?
👉 शेतकरी, शेती व सहकार विषयक प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेच्या प्रवाहात जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Q3. सतीश सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का?
👉 अधिकृत घोषणा नसली तरी भाजप आमदार नितेश राणेंसोबतचे फोटो चर्चांना कारणीभूत ठरले आहेत.

Q4. पुढील निर्णय कधी जाहीर होणार आहे?
👉 बुधवारपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे सावंत यांनी सांगितले आहे.

Q5. या राजीनाम्याचा उबाठा शिवसेनेवर काय परिणाम होईल?
👉 कणकवली मतदारसंघात पक्षाला हा मोठा धक्का मानला जात असून संघटनात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT