Uddhav Thackeray News Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी; कार्यकर्त्यांकडून मोठे शक्तीप्रदर्शन

Uddhav Thackeray News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज खेडमध्ये सभा होणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Konkan News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज खेडमध्ये सभा होणार आहे. या सभेआधी ठाकरे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. शिवसेनेचे (Shivsena) नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा आहे.

या सभेमध्ये खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सभा सस्थळापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. त्या माध्यमातून कदम मोठे शक्तीप्रदर्शन करत आहेत. तसेच ठाकरे गटाच्या वतीनेही सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे हे सभेसाठी खेडमध्ये दाखल झाले आहेत. शिवसैनिकांनी त्यांचे खेडमध्ये जोरदार स्वागत केले. या सभेसाठी गोळीबार मैदानाची निवड करण्यात आली आहे. येथे भव्य व्यासपीठ आणि शिवसैनिकांना बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात खुर्चांची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे या सभेतून कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वर्चस्व असलेल्या भागात ही सभा होत आहे. या सभेला प्रचंड गर्दी होणार असल्याचे सांगितले जात आहे. सभेला 30 हजाराहून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत, असा दावा ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे.

सभेची जय्यत तयारी ठाकरे गटाने केली आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 300 पोलीस आणि 50 होम गार्ड खेडमध्ये तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच सभेमुळे वाहतुकीचे मार्गही बदलण्यात आले आहेत. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT