Umesh Vertak passes away after the accident in bullock cart race
Umesh Vertak passes away after the accident in bullock cart race  sarkarnama
कोकण

बैलगाडा शर्यत जिंकली, पण मृत्यूने त्याला हरवले

सरकारनामा ब्युरो

रायगड : रायगड येथे बैलगाडा शर्यतील (Bullock cart race) अलिबाग (Alibagh) पंचायत समिती उमेश वर्तक (Umesh Vartak) यांचा अपघात (accident) झाला होता. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मुंबई येथील एका रुग्णालयात महिनाभर त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेर मंगळवारी (२२ मार्च) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुली असा परिवार आहे. (Bullock cart race )

मिळालेल्या माहितीनुसार, बैलगाडी स्पर्धेत आपली गाडी पहिल्या नंबरवर असल्याचा आनंद अनुभवत असताना मागून आलेल्या दुसऱ्या बैलगाडीने धडक दिल्याने उमेश वर्तक हे गंभीर जखमी झाले होते. उमेश वर्तक याची महिनाभर चाललेली मृत्यूशी झुंज अखेर मावळली आहे. मंगळवारी सायंकाळी उमेश वर्तक (53) याची प्राणज्योत मावळली. उमेश वर्तक हे अलिबाग पंचायत समितीचे विद्यमान सदस्य होते. त्यांच्या मृत्यूमुळे वरसोली परिसरात दु:खाचे सावट पसरले आहे.

उमेश वर्तक हे वरसोलीत बैलगाडीप्रेमी म्हणून परिचित होते. राजकारणाशी कुठलाही संबंध नसलेल्या उमेश वर्तक यांना अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग पंचायत समिती निवडणुकीत उभे केले आणि जिंकूनही आणले. उमेश वर्तक यांनी महिनाभरापूर्वी आपली बैलगाडी एका स्पर्धेत उतरवली होती. स्पर्धेत उमेश यांची गाडी सर्वांत पुढे होती. आपल्या बैलांची करामत उमेश भारावून पाहत होते. इतक्यात मागून आलेल्या एका बैलगाडीचा धक्का उमेश यांना लागला. उमेश यांची बैलगाडी स्पर्धेत जिंकली होती. मात्र अपघातात जखमी झालेले उमेश वर्तक यांचा मृत्यूने पराभव केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT