MLA Vaibhav Naik News  Sarkarnama
कोकण

Vaibhav Naik News : रवींद्र चव्हाणांची गुप्त भेट, वैभव नाईकांनी सांगितलं कारण

सरकारनामा ब्यूरो

Sindhudurg Politics News :

कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या गुप्त भेटीने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी या भेटीवर स्पष्टीकरण दिले आहे.

आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत सैनिक असून, आमचा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. मला मंत्रिपदाच्या ऑफर होत्या. माझी चौकशी सुरू आहे. खरं तर या चौकशा सुरू असताना वीस वर्षांतला हिशेबही आपण त्यांच्याकडे दिलेला आहे. यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल केलेले वक्तव्य म्हणजे चव्हाण आणि Narayan Rane यांच्यातील अंतर्गत धुसफूस असल्याची टीका वैभव नाईक यांनी केली.

रवींद्र चव्हाण यांचा नियोजित दौरा होता. याच दौऱ्यादरम्यान शासकीय विश्रामगृह कणकवली येथे ते येणार होते. उड्डाणपुलासंदर्भात त्यांनी त्या कामामध्ये बदल सुचवले आहेत. ते काम लवकर झाले पाहिजेत म्हणून मी आणि कन्हैया पारकर शासकीय विश्रामगृहामध्ये कार्यकरी अभियंता सर्वगोड यांच्या समोरच भेटलो. आणि त्यांना पत्र दिले. हे काम लवकर होण्यासाठी त्यात बदल सुचवू नका, अशी विनंती त्यांना केल्याचे आमदार वैभव नाईक म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अलीकडेच उद्धव ठाकरेंचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा झाला आहे. त्या दौऱ्यामुळे भाजपच्या सगळ्या लोकांमध्ये धडकी भरलेली आहे. आज भाजपला लोकसभेसाठी उमेदवार मिळत नाहीत. या जिल्ह्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच ते भ्रमिष्ट झाले असल्याची टीकाही आमदार नाईक यांनी केली.

जिल्ह्यातील लोक कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहिले आहेत. या दौऱ्यात अल्पावधीमध्ये हजारो लोक वेगवेगळ्या ठिकाणी आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्या मतदारसंघांमध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये उद्धव ठाकरेंना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच रवींद्र चव्हाण हे जनतेची दिशाभूल करीत असल्याचा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT