Vasai Panchayat samiti Election
Vasai Panchayat samiti Election  Sarkarnama
कोकण

वसई पंचायत समिती' निवडणूक जाहीर : सभापतिपद पुन्हा महिला ओबीसींकडे

सरकारनामा ब्यूरो

विरार : वसई पंचायत समितीच्या निवडणुका (Vasai Panchayat samiti Election) होऊन दोन महिन्याचा कार्यकाळ लोटला असतानाही या ठिकाणी सभापती पदाची निवडणूक आरक्षणावरून रखडली होती. ही निवडणूक अखेर 29 नोव्हेंबरला होत आहे. महत्वाचे म्हणजे या ठिकाणी न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसी आरक्षण (OBO Reservation) रद्द केल्याने निवडणुका झाल्या होत्या. तेच 'ओबीसी' आरक्षण पुन्हा सभापती पदासाठी ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या निवडणुकीसाठी 29 नोव्हेंबरला सकाळी 11 ते 3 दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ असून त्याकानंतर 15 मिनिटांनी अर्ज मागे घेण्यासाठीचा वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणूक घेण्यात येणार असल्याचे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिकराव गुरसल यांनी जाहीर केले आहे.

वसई पंचायत समितीच्या दोन जगासाठी झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने विजय मिळविल्याने पंचायत समितीमध्ये असलेली भाजप -शिवसेना युतीची सत्ता गेली. या निवडणुकीत भाताने गणातून अशोक पाटील तर, तिल्हेर गणातून गीता पाटील हे विजयी झाले आहेत. यापूर्वी पंचायत समितीवर बविआचीच सत्ता होती. मात्र, महानगरपालिका झाल्यावर त्यात बदल झाला होता.

दरम्यान निवडणुकीपूर्वी भाताने आणि तिल्हेर या दोन्ही जागा शिवसेने कडे होत्या, मात्र, या निवडणुकीत त्या दोन्ही जागा बविआने जिंकल्याने पंचायत समितीमधील शिवसेनेच्या जागा कमी होऊन त्यांच्याकडे एकच जागा राहिली तर, भाजपकडे 2 जागा आहेत. 8 जागांच्या या पंचायत समितीमध्ये बविआकडे आता 5 जागा झाल्याने त्यांची निर्विवाद सत्ता 'समिती'वर आली आहे. मात्र, या निवडणुकीत सभापती पदाची लॉटरी कुणाला लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT