Jayant Patil
Jayant Patil sarkarnama
कोकण

जलसंपदाची गाळ उपसा मोहिम : चिपळूण, महाडचा पूराचा धोका टळणार

सरकारनामा ब्युरो

रत्नागिरी- चिपळूण : राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाची संपूर्ण यंत्रणा चिपळूण, महाड येथील नद्यांचा गाळ काढण्यासाठी झोकून काम करत असून जलसंपदा विभाग हे गाळ उपसा उदिष्ट पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच चिपळूण - महाडवासियांना येत्या काळात पूराचा सामना करावा लागणार नाही, अशी खबरदारी घेतल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

राज्याच्या जलसंपदा विभागाने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी नदी व शिव नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. आज चिपळूण येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भेट देऊन या कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. गेल्यावर्षी रायगड, महाड, चिपळूण आणि आजुबाजूच्या परिसरात अतिवृष्टी झाली आणि या तालुक्यांना पूराचा मोठा सामना करावा लागला.

या भागातील नद्यांमध्ये साचलेला गाळ हा पूर येण्याच्या विविध कारणांपैकी एक कारण आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या काळात पूर टाळता यावा म्हणून आम्ही गाळ उपसा करण्याची ही भूमिका घेतली असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत ४ लाख क्युबिक मीटर गाळ काढला गेला आहे. तर

पावणे आठ लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचे आमचे उदिष्ट आहे. या कामासाठी आतापर्यंत १२ फोकलेन काम करत होते तर आता अधिकचे १४ फोकलेन आणि ३० टीपर आणले गेले आहेत. चिपळूणबरोबरच महाडमध्येही हे काम कार्यरत राहिल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT