Ramdas Kadam Sarkarnama
कोकण

Ramdas Kadam : सिंगापूर, श्रीलंका, अमेरिकेला कुणाचे हॉटेल्स आहेत? रामदास कदमांनी भरसभेत सांगितलं...

Shivsena : ''रामदास कदमांनी तुमची मराठवाड्यात उंची वाढवली...''

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (दि.19 मार्च) खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते रामदास कदम बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

रामदास कदम म्हणाले, ''उद्धव ठाकरे हे एक वर्षभर मला गाडीत घेतल्याशिवाय गाडीत बसत नव्हते. पण नंतर उद्धव ठाकरे मला चार वर्ष भेटले नाहीत. त्याच कारण काय होतं हे तरी त्यांनी सांगावं ना. आता उद्धव ठाकरे हे सुभाष देसाईंना बरोबर घेऊन फिरतात. पण बाळासाहेब ठाकरे हे रामदास कदम सारख्या वाघाला संभाळत होते. आता उद्धव ठाकरे हे सुभाष देसाई यांच्या सारख्या शेळ्या-मेंढ्यांना संभाळतात'', अशी टीका त्यांनी केली.

''उद्धव ठाकरे सांगत आहेत की माझे हात खाली आहेत. मग मिठाईचे खोके दिले ते कुठे गेले? याविषयी सर्व एकदिवस नक्की समोर येईल. मग कुणाचे सिंगापूर, श्रीलंका, अमेरिकेला हॉटेल आहेत. खोकेच्या-खोके वाटून याच रामदास कदमांनी तुमची मराठवाड्यात उंची वाढवली''

''पण आम्ही मरेपर्यंत कधीही डाग लागू देणार नाही. कोकणातले अनेक प्रस्ताव आपल्याकडे आहेत. ही गर्दी उद्धव ठाकरेंनी पाहावी. आता आमच्यासमोर कोण उभं राहिलं तर त्याला गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही'', असा घणाघात रामदास कदमांनी केला.

''बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला. एवढंच उद्धव ठाकरे हे खरं बोलत आहेत. अन्यथा ते सर्व खोट बोलत आहेत. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते ज्या दिवशी शिवसेना ही काँग्रेससोबत जाईल, त्या दिवशी शिवसेना बंद करेल. मग आता उद्धव ठाकरे यांनी वडीलांचा आपमान केला. उद्धव ठाकरे यावर का बोलत नाहीत'', असा सवाल त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT