Sindhudurg Politics; ravindra chavan, Nilesh Rane And Nilesh Rane sarkarnama
कोकण

Nilesh Rane : तळकोकणात युती तुटण्यामागे नेमकं कोण? भावाला सेफ करत नीलेश राणेंनी खापर फोडलं भाजपच्या बड्या नेत्यावर

Sindhudurg Politics : राज्यात एकीकडे महायुती सेफ झोनमध्ये असून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. अशातच पद्धतीने तळकोकणात देखील लढती होणार आहे. पण येथे त्या पेक्षा महायुती तुटली आणि शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे.

Aslam Shanedivan

  1. सिंधुदुर्गमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत असून यामागे महायुतीतील गंभीर मतभेद उघड झाले आहेत.

  2. नीलेश राणेंनी भाजपच्या बड्या नेत्याकडे बोट दाखवत नितेश राणेला ‘सेफ’ केलं आहे.

  3. या विधानामुळे सिंधुदुर्गातील राजकारणात नवा खळबळ उडाली असून अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

Sindhudurg News : राज्यात एकीकडे महायुती एकसंघ असून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहे. पण तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती तुटली असून शिवसेना-भाजपमध्ये वाद टोकाला गेला आहे. येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली असून शेवटी येथे भाजप-शिवसेनेनं वेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे. या वादामुळे राणे बंधुंमध्ये देखील संघर्ष निर्माण झाल्याचे दिसत आहे. यावरून जिल्ह्यात महायुती तुटण्यामागे पालकमंत्रीच जबाबदार असल्याचे शिवसेना नेते राजन तेली यांनी आरोप केला आहे. तर आमदार नीलेश राणे यांनी मात्र आपल्या भावाला सेफ करत युती तुटण्याचे खापर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर फोडले आहे. त्यामुळे याची आता जिल्ह्यात खुलेआम चर्चा सुरू आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा तसा भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांचा बालेकिल्ला. पण येथे महायुतीती वादाची ठिणगी त्यांच्याच घरातून पहिली पडली. त्यांचे सुपूत्र पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यात युती होणार नाही. भाजप स्वबळावर लढेल असे म्हणत शिवसेना-भाजप या दोन पक्षांमध्ये वाद लावला. फक्त दोन पक्षातच वाद लावला नाही तर घरातच वादाची फोडणी टाकल्याची येथे चर्चा आहे.

पण आपल्या बेधडक आणि स्पष्ट वक्तेपणामुळे ओळखे जाणाऱ्या आमदार नीलेश राणे यांनी याबाबत स्पष्ट बोलताना जिल्ह्यातील महायुती ही भाजपमुळे तुटली. पण जिल्ह्यातील नेत्यामुळे नाही तर जिल्ह्याच्या बाहेरच्या नेत्यांकडून तुटली असे सांगत भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्याकडे बोट केले. त्यांचे हे बोट आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडेच असल्याची येथे चर्चा सुरू आहे. दरम्यान निलेश राणे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरच थेट निशाणा साधल्यानंतर आता येथे भाजप,शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

जिल्ह्यात जिल्ह्यातील तीनही नगरपरिषद आणि नगरपंचायत शिवसेना-भाजपा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पण युती राहावी यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट भूमिका घेतली. यासाठी त्यांनी शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री दीपक केसरकर, मंत्री नितेश राणे, निलेश राणे यांची एकत्रित बैठक घेतली. यावेळी युतीसाठी प्राथमिक चर्चाही झाली. तसे झाले नाही. यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी नितेश राणेंवर युती तुटल्याचा ठपका ठेवला होता. पण नीलेश राणे यांनी त्यांच्या कणकवली दौऱ्यात याचे खापर नाव न घेता चव्हाण यांच्यावर फोडले.

त्यांनी महायुती तोडायचा जो निर्णय झाला आहे तो जिल्ह्यातून झालेला नाही. नितेश राणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. हा महायुतीत तोडायचा जो निर्णय झाला आहे तो बाहेरून झालेला आहे. आणि मी यापूर्वीही अनेकदा यावर स्पष् बोललो आहे. पण आता आमच्या नात्यावर बोललं जात आहे. पण हे नातं असं कुठल्या निवडणुकांमुळे तुटत नसतं आणि ते तुटणारही नाही.

महायुतीबाबत जे डिसिजन घेतले गेले ते भारतीय जनता पक्षाच्या वरच्या स्तरावरून घेतले गेलं. जे आम्हाला दिसत आहे. म्हणून आम्हाला जे करायचं होतं त्यासाठी आम्ही खूप वेळ थांबलो. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांचा डिसिजन होत नव्हता म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. पण त्याआधी आम्ही राणे साहेबांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेवून सगळी माहिती दिली. मग हा निर्णय घेतला असेही नीलेश राणे यांनी म्हटलं आहे.

या दाव्यानंतर आता भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी, शिवसेनेनेच सुरुवातीला नगराध्यक्षपदाचा उमेदवार परस्पर जाहीर केला होता, असा आरोप केला आहे. सावंत पुढे म्हणाले की, युती झाली असती तर मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असती आणि त्याचा फायदा विरोधी पक्षांना झाला असता. हे याआधी देखील नितेश राणे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे जशी युती झाली नाही तशीच महाविकास आघाडीदेखील अस्तित्वात आलेली नाही, असे म्हटलं आहे.

FAQs :

1) सिंधुदुर्गात भाजप-शिवसेना वेगळी लढत का करत आहेत?
निलेश राणेंच्या सूचनेनुसार अंतर्गत मतभेद आणि काही नेत्यांची भूमिका यामुळे युती तुटली आहे.

2) निलेश राणेंनी कोणाकडे बोट दाखवलं?
त्यांनी थेट नाव न घेता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर संकेतात्मक आरोप केला.

3) नितेश राणे यांना ‘सेफ’ करण्याचं नेमकं काय प्रकरण आहे?
स्थानिक पातळीवरील राजकारणात त्यांच्या बाजूने काही निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

4) महायुतीवर याचा परिणाम होईल का?
होय, सिंधुदुर्गात महायुतीची प्रतिमा कमकुवत होण्याची शक्यता आहे.

5) स्थानिक निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
भाजप आणि शिवसेनेचे मतविभागणी होण्याची भीती असल्याने विरोधकांना फायदा होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT