Bharat Gogawale News : Sarkarnama
कोकण

Bharat Gogawale News : मंत्रिपदासाठी देव पाण्यात ठेवलेल्या गोगावलेंना उदय सामंत म्हणाले....

Shinde group Politics : गेल्या दीड वर्षांपासून गोगावले मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत.

अनुराधा धावडे

Raigad Politics : ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून आपणच रायगडचे पालकमंत्री होणार असा विश्वास महाडचे आमदार भरत गोगावले यांना होता. मात्र रायगडच्या पालक मंत्री पदाची माळ राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या गळ्यात पडली.पण शिवसेनेत फूट पडली आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मंत्र्यांच्या यादीमध्ये आमदार गोगावले यांच नाव येऊनही त्यांचा शपथविधी झाला नाही. गेल्या दीड वर्षांपासून गोगावले मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत.

आमदार गोगावले मंत्री होणार असा दावा स्वत: गोगावले आणि त्यांचे समर्थकही करीत आहेत. अनेक मुहूर्त आणि तारखा सरल्या पण अद्याप गोगावले यांचा शपथविधी काही झाला नाही. दुसरीकडे, आमदार गोगावले आणि मंत्री पद हा मुद्दा राजकीय वर्तुळासह सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत राहिला. 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरु झाली. पण तरीही गोगावलेंच्या मंत्रीपदाचा मुहूर्त लागेना. हा चर्चेचा विषय बनला असून या प्रकरणी मंत्री उदय सामंत यांनी गोगावले यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

उदय सामंत गोगावले यांच्या मतदारसंघात आले होते,यावेळीच त्यांनी गोगावलेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.'भरतशेठ मंत्री व्हावेत ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. 2024 ची निवडणुकही जवळ आली आहे. ते लवकरच मंत्री होतील, गोगावले आणि त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे.असा दावाही सामंतांनी यावेळी केला.

गोगावले यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष प्रेम आहे. भरतशेठ विकस कामाचं पत्र घेऊन येतात आणि मी सही करतो असं सांगत सामंत यांनी गोगावले यांच्या कार्यकर्त्यांना खुष करण्याचा प्रयत्न केला.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT