Kolhapur News: : कोयना धरणाचे ६७ टीएमसी पाणी मुंबईकडे वळवण्याच्या फडणवीस सरकारच्या प्रस्तावावरून पश्चिम महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील पाण्याच्या भविष्यातील गरजांचा विचार करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
या प्रस्तावाला पश्चिम महाराष्ट्रातील विरोधाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकारच्या प्रस्तावाला समर्थन दिले आहे. वीजनिर्मितीनंतर समुद्राला जाणारे पाणी मुंबईकरांना पिण्यासाठी दिले, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
वीजनिर्मितीसाठी कोयना धरणाची निर्मिती करण्यात आली. कृष्णा लवादानुसार किती पाणी सिंचनासाठी आणि किती पाणी वीजनिर्मितीसाठी वापरायचे, हे निश्चित झाले आहे. वीजनिर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी चिपळूण परिसरातून कोकणाच्या दिशेने वाहते. या पाण्याचा पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनासाठी वापर होत नाही, असे मुश्रीफ यांनी सांगितले. कोयना धरणातील पाण्याचा पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनासाठी सध्या वापर सुरू आहे. मात्र, मुंबईला नेण्याचा प्रस्ताव असलेले पाणी सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या वापरात नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती झाल्यानंतर समुद्राला जाणारे पाणी मुंबईतील नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. वीजनिर्मितीनंतर पाणी समुद्राला जाण्यापेक्षा मुंबईतील नागरिकांना पिण्यासाठी दिले गेले, तर त्याला काही हरकत नाही. त्यासाठी विरोध असण्याचेही कारण नाही, असे मुश्रीफ म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रातील पाणी अन्यत्र वळवले जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात असताना मुश्रीफ यांनी नागरिकांना घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले.
कोयनेच्या पाण्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जलस्रोतांचे पाणी वळवण्याबाबतही मुश्रीफ यांनी भूमिका स्पष्ट केली. वारणेचे पाणी पश्चिम महाराष्ट्रातून अन्यत्र नेऊ देणार नाही. राज्य सरकारचाही तसा कोणताही विचार नाही. पुराचे पाणी मराठवाड्याला देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाहीही मुश्रीफ यांनी दिली. जे पाणी आतापर्यंत समुद्राला जात होते, तेच पाणी मुंबईला नेण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे जनतेने घाबरण्याचे कारण नाही. आमच्या वाट्याचे पाणी जाणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.