Mumbai News : महायुती सरकारच्या विजयात मोठा आहे. या योजनेमुळे निवडणुकीचा निकालच बदलल्याची चर्चा आहे. पण या निकालानंतर सरकारनं लाडक्या बहिणींना एकापाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे 2100 रुपयांच्या आशेवर पाणी फेरले गेल्यानंतर सरकार दरबारामधून आणखी महत्त्वाची व तितकीच धक्कादायक अपडेट समोर येत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) एकीकडे मे चा हफ्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे चिंतातूर झालेल्या महिलांचे या हफ्त्याकडे लक्ष लागलेले असतानाच एक मोठी माहिती समोर आली असून आता 50 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारकडून (Mahayuti Government) लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरु करण्यात आली आहे.यात 50 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती आयकर विभागाकडून मागवण्यात आली आहे. तसेच सरकार इन्कम टॅक्स विभागाच्या माहितीच्या आधारे महिलांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी करणार आहे.
महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात सुरु केलेल्या लाडकी बहीण योजना चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. तसेच या योजनेचा आत्तापर्यंत राज्यातील तब्बल अडीच कोटींहून जास्त महिला लाभ घेत आहेत. त्यातील काही महिलांनी नियमांचं उल्लंघन करत योजनेचा लाभ घेतल्याचंही धक्कादायक माहितीही समोर आल्यानंतर सरकारनं आता कठोर पावलं उचलली आहे.
महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून ही योजना बंद होणार नसल्याचंही वारंवार ग्वाही दिली जात असली तरी विरोधकांकडून ही योजनेवर सातत्यानं शंका उपस्थित केली जात आहे.यातच आता तब्बल 50 लाख महिलांचं लाडकी बहीण योजनेतील प्रमुख अट असलेल्या उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त असल्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे संबंधित महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होतात. मात्र,मे महिन्याच्या अखेर येत असतानाही अजूनही या योजनेतील बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी 1500 रुपयांच्या हप्ता कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहेत. कदाचित मे-जूनचे पैसे वटपौणिमेच्या दिवशी देण्याचे नियोजन सरकारचे सुरु असल्याचे बोलले जात आहे. पण याबाबत अद्याप सरकारकडून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही.
मे महिना संपला तरीही महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांना अनेक प्रश्न पडले आहेत. त्यानंतर आता मे आणि जूनचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र,हे पैसे कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु जून महिन्यात महिलांच्या खात्यात नक्की पैसे जमा होणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये 3000 रुपये कदाचित एकत्र येतील किंवा दोन्ही हप्ते वेगवेगळे येतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.