Tekchand savarkar Sarkarnama
महाराष्ट्र

Tekchand Savarkar : लाडकी बहीण योजना मतांसाठीचा जुगाड! अखेर महायुतीची भानगड पुढे आली…

Rajanand More

Mumbai : मुंख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महायुतीच्या नेत्यांकडून अडचणी वाढवणारी विधाने केली जात आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तंबी दिल्यानंतरही महायुतीची ‘हिट विकेट’ पडत आहे. एका आमदाराने तर थेट एक घाव दोन तुकडे केले आहेत. ही योजना म्हणजे मतांसाठीचा जुगाड असल्याचे या आमदारांनी लोकांसमोरच सांगून टाकले आहे.

शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या विधानांवरून यापूर्वी वाद निर्माण झाला होता. आता त्यामध्ये भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांनी भर घातली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे.

काय म्हणाले टेकचंद सावरकर?

एका कार्यक्रमात बोलताना टेकचंद सावरकर म्हणत आहेत की, आम्ही इतकी मोठी भानगड कशासाठी केली आहे, तुम्ही इमानदारीनं सांगा. ज्यादिवशी तुमच्या पुढं इलेक्शनची पेटी येईल, त्यावेळी माझी लाडकीय बहीण कमळाला मत देईल. यासाठी आम्ही हे जुगाड केलं आहे, असे बोलत असताना सावरकर दिसत आहेत.

सोनवणे एवढ्यावरच थांबले नाहीत. आपले नेते खोटं बोलत असल्याचं सूचक विधानही त्यांनी केले आहे. ते म्हणतात, सर्वजण खोटं बोलले असतील, मी खरं बोलतोय. बोलायचं एक आणि करायचं एक. मी काय रामदेव बाबांचा कार्यकर्ता आहे?, असं बोलताना सावरकर व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

महायुतीची भानगड पुढे आली

सावरकर यांच्या विधानावरून वडेट्टीवारांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. अखेर महायुतीची भानगड पुढे आली, असे निशाणा साधत ते म्हणाले, महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे, अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT