devendra fadnavis ladki bahin yojana Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : 'लाडक्या बहि‍णींचा देवाभाऊ' साधणार राखी पौर्णिमेनिमित्त महिलांशी थेट संवाद

devendra fadnavis ladki bahin yojana : विरोधकांचा हा दावा महायुतीतील नेत्यांकडून खोडून काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू झाले आहेत. लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आता भाजपही मैदानात उतरलं आहे.

Rashmi Mane

राज्य सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना ही केवळ विधानसभा निवडणुकीसाठीचा जुमला असून, त्यानंतर ही योजना बंद पडणार असल्याचा दावा विरोधकांकडून सतत केला जातो. तर विरोधकांचा हा दावा महायुतीतील नेत्यांकडून खोडून काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू झाले आहेत.

ही योजना लोकांसमोर पोहोचवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेने मुख्यमंत्र्यांचा चेहरा पुढे केला तर अजितदादांनी (Ajit Pawar) चक्क गुलाबी वादळ आणलं. लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आता भाजपही मैदानात उतरलं आहे.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक्सवर पोस्ट करत भाजपच्या या नवीन उपक्रमाची माहिती दिली आहे."स्त्रीसक्षमीकरण हा ध्यास घेऊन केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील महायुती सरकार व विशेषतः भारतीय जनता पार्टी अहोरात्र मेहनत घेत आहे. विविध योजना व उपक्रमांच्या द्वारे स्त्रीला सशक्त करण्याचे काम पक्ष व सरकारद्वारे आम्ही करत आहोत.

येत्या राखी पौर्णिमाला 18 ऑगस्ट रोजी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी "लाडक्या बहिणींचा देवाभाऊ" या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. राज्यातील सर्व माता - भगिनींना विनंती आहे की, आपण सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. तसेच, माझी भाजपा कार्यकर्त्यांना विशेषतः भाजपा महिला मोर्चाला विनंती आहे की, या उपक्रमाची जबाबदारी घेऊन आपण जास्तीत जास्त महिलांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे."

विधानसभेच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर या योजनेचे श्रेयवादावरून महायुतीमध्ये आता चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. भाजपनेही आता या कार्यक्रमाचे आयोजन करून भाजपही मैदानात उतरला आहे. लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यात कधी येणार याची आतुरता आता राज्यातील महिलांना लागली आहे. 

"सशक्त महिला म्हणजेच सक्षम महाराष्ट्र असू शकतो. याच उद्देशानं राखी पौर्णिमेच्या पवित्र पर्वावर 18 ऑगस्ट 2014 रोजी राज्यभरात 'लाडक्या बहिणींचा देवाभाऊ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे. हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी भाजप महिला मोर्चाला देण्यात आली आहे. जास्तीत जास्त महिलांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, अशी ही विनंती या पोस्ट मध्ये करण्यात आली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT