Ladki Bahin Yojana Sarkarnama
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर

Ladki Bahin Yojana January payment : नवीन वर्ष आलं, जानेवारी महिन्याचे 15 दिवस उलटून गेले, 14 जानेवारीला संक्रात होती या संक्रातीआधी या महिन्याचा हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, अजूनही या महिन्याचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत.

Rashmi Mane

विधानसभा निवडणूकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. सरकारने लागू केलेल्या या योजनेला संपूर्ण राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. निवडणुकीपूर्वी लागू करण्यात आलेली ही योजना महायुतीसाठी गेंम चेंजर ठरली. निवडणुका पार पडल्यावर राज्यात पुन्हा महायुती सरकार स्थापन झाले. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच डिसेंबर महिन्याचे पैसेही महिलांच्या खात्यात जमा झाले.

मात्र आता नवीन वर्ष आलं, जानेवारी महिन्याचे 15 दिवस उलटून गेले, 14 जानेवारीला संक्रात होती संक्रातीआधी या महिन्याचा हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, अजूनही या महिन्याचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत. जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा अनेक बहि‍णींना लागली आहे. आतापर्यंत महिलांना 9000 रुपये मिळाले आहेत.

माहितीनुसार लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी वाट बघावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता देण्याचा कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेचा हप्त्या संदर्भात निर्णय न झाल्याने पुढील हप्त्यासाठी महिलांना वाट पाहावी लागणार आहे. याबाबतचा निर्णय कधी होतो याकडे बहि‍णींचे लक्ष लागले आहे.

कधी मिळणार 2100 रुपये?

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने पुन्हा सत्ता आल्यास लाडकी बहीण योजनेत मिळणाऱ्या पैशांमध्ये वाढ केली जाईल 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासनदिले होते. मात्र निवडणूक झाल्यानंतरही या बद्दल काहीच निर्णय घेतला गेलेला नाहीये. सुत्रांच्या माहितीनुसार, अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयी निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे मार्च महिन्यापासून महिलांना या योजनेचे 2100 रुपये दिले जाऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT