ladki bahin yojana Sarkarnama
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana Scam: लाडकी बहीण योजनेवर पुरुषांचा 'डल्ला'! 14 हजार पुरुषांनी घेतला लाभ, सरकारला 21कोटीला गडवलं

Ladki Bahin Yojana misuse exposed as 14,000 men claim benefits:काही नावांबद्दलही संशय असून पुरूष असूनही त्यांनी महिलांची नावे देऊन योजनेचा लाभ घेत ते पैसे मिळवल्याचीही शंका आहे. हे पुरुष कोण आहेत, त्यांच्या नावाची छाननी सुरु आहे.

Mangesh Mahale

तब्बल 14 हजार 298 पुरुषांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १० महिन्यापर्यंत या 'लाडक्या भावांना'21 कोटी 44 लाखांचे वाटप करण्यात आले आहे. योजेनच्या लाभार्थ्यांची छानणी करण्यात आली त्यात हा प्रकार समोर आला. महिलांसाठी असलेल्या या योजनेवर पुरुषांनी डल्ला कसा मारला, असा प्रश्न सध्या विचारण्यात येते आहे. याला जबाबदार कोण, असे प्रश्न या निमित्ताने विचारण्यात येत आहे.

14 हजार 298 पुरुषांनी या योजनेवर डल्ला करा मारला, याबाबत छाननी करण्यात येत आहे. 10 महिन्यांपर्यंत लाडक्या पुरूषांनी 1500 रुपये लाटले. त्यांना मिळणारे 1500 रुपये बंद करण्यात आले आहेत. मात्र या पुरूषांनी सुमारे वर्षभर जे पैसे लाटले, सरकार ते आता परत घेणार का असा प्रश्नही उपस्थित होत आहे. २ लाख ३६ हजार १४ लाभार्थ्यांच्या नावाबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या यादीतील काही नावांबद्दलही संशय असून पुरूष असूनही त्यांनी महिलांची नावे देऊन योजनेचा लाभ घेत ते पैसे मिळवल्याचीही शंका आहे. हे पुरुष कोण आहेत, त्यांच्या नावाची छाननी सुरु आहे. त्यांना मिळणारे 1500 रुपये बंद करण्यात आले आहेत. मात्र या पुरूषांनी सुमारे वर्षभर जे पैसे लाटले, सरकार ते आता परत घेणार का असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

या योजनेची छाननी करून लाखो अपात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात आले. पण आता मात्र आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना पडताळणीला स्थगिती देण्यात आली आहे.

  • २१ ते ६५ वयोगटातील अर्ज मंजूर झालेल्या महिलांना दर महिना १५०० रुपये आर्थिक लाभ देण्यात येतो.

  • योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर वर्षाला ५० हजार कोटींचा बोजा पडतो.

  • गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या योजनेसाठी एकूण २ कोटी ६३ लाख अर्ज आले होते.

  • या अर्जाची छाननी करून पहिल्यांदा २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ दिला गेला.

  • त्यानंतर ही संख्या २ कोटी ४७ लाख लाडक्या बहीणींच्या अर्जावर स्थिरावली. गेली तीन महिने ही संख्या कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT