Ladki Bahin Yojana Scheme News Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रिया मुदतीत पूर्ण न केल्यामुळे राज्यातील हजारो लाभार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे.
ई-केवायसी करताना काही त्रुटी राहिल्यामुळे या महिलांचे पैसे जमा झालेले नाही, ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी राज्यात अनेक ठिकाणी लाडक्या बहीणींनी आंदोलन केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांना वगळण्यसाठी प्रशासनाने ३१ डिसेंबरपर्यंत ईकेवायसीची मुदत दिली होती. पण मुदत संपल्यानंतरही अनेक महिलांना ई केवायसी करता आली नाही, तर बहुसंख्य महिलांकडून ईकेवायसी करताना चूका झाल्या आहेत. त्यामुळे अशा महिलांचा प्रति महिना १५०० रूपयांचा लाभ मिळणे बंद झाले आहे.
ई-केवायसीमुळे बंद झालेला ₹१५०० चा हप्ता पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत मंत्री नरहळी झिरवाळ यांनी दिले आहे. हिंगोलीमध्ये बोलताना मंत्री झिरवाळ यांनी ई केवायसीच्या मुदतवाढीवर वक्तव्य केले आहे. राज्य सरकारकडून ई केवायसीची मुदत वाढवण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे. ई केवाय न केलेल्या राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.
1500 रुपयांचा हप्ता न मिळाल्याने राज्यभरातील पात्र महिलांना नाराजी व्यक्त करीत, सरकारचा निषेध करीत हिंगोली, भंडारा, धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयांवर महिलांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाची दखल सरकार घेण्याची शक्यता आहे. सरकारकडून लाडक्या बहिणींना मुदतवाढ देण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे समजतेय.
राज्यभरातून यामुळे लाडक्या बहिणींच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहे. धुळे, हिंगोली अन् भंडाऱ्यासारख्या जिल्ह्यात लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. आता सरकारकडून लाडक्या बहिणींना मुदतवाढ देण्याबाबत विचार सरकार करीत असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले. यावर अधिकृत लवकरत निर्णय होईल, असे नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.