Ambadas Danve and Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Ambadas Danve News : मध्यप्रदेशात `लाडली बहना` ने गाशा गुंडाळला, देवाभाऊ यावर काय बोलणार ?

Ladli Behan Yojana will be closed in Madhya Pradesh, claims Ambadas Danve : योजनेची 'शून्य उपयुक्तता' दाखवून या योजनेचा मध्यप्रदेशातून गाशा गुंडाळण्यात आला आहे. महाराष्ट्रात काय होणार त्याची ही पूर्वकल्पना आहे. इथेही हा इलेक्शन जुमला आहे! बस्स!!

Jagdish Pansare

Maharashtra Shivsena v/s BJP Politics News : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यातील महायुती सरकारने मध्यप्रदेश सरकारच्या `लाडली बहन` योजनेतून प्रेरणा घेऊन `मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण` योजना सुरू केली. सुरवातीपासूनच महाविकास आघाडीने या योजनेवर निवडणुकीच्या तोंडावर आणलेली योजना, अशी टीका केली. महायुतीची सत्ता गेल्यानंतर ती बंद होणार, असा दावा विरोधकांकडून केला गेला. विरोधकांच्या या दाव्याला पुष्टी देणारी एक बातमी समोर आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एका दैनिकाच्या वृत्ताचा हवाला देत मध्यप्रदेशातच `लाडली बहन` योजना बंद पडणार असल्याचा दावा केला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत यावरून राज्यातील महायुती सरकारला डिवचले आहे.

मध्यप्रदेशात लोकसभेला २६ पैकी २६ जागा भाजपला देणारी `लाडली बहना` योजना आता बंद होणार आहे! योजनेची 'शून्य उपयुक्तता' दाखवून या योजनेचा मध्यप्रदेशातून गाशा गुंडाळण्यात आला आहे. महाराष्ट्रात काय होणार त्याची ही पूर्वकल्पना आहे. इथेही हा इलेक्शन जुमला आहे! बस्स!!

लाडक्या बहिणीचा देवाभाऊ यावर बोलणार का ? असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे. (Devendra Fadanvis) राज्यात अडीच कोटीहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचे महायुती सरकारचे उदिष्ट आहे. 1 कोटी 60 लाख पात्र महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याचा दावा सरकारच्यावतीने केला जात आहे.

सरकारने या योजनेअंतर्गत आधी प्रत्येकी पंधराशे रुपयाचे दोन हप्ते पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले होते. तर तिसऱ्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 46 हजार कोटींची तरतूद यासाठी राज्य सरकारने केली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यासाठी सरकारने इतर योजनाचा निधी वळवला, सरकारी कर्मचाऱ्यांना पगार करायला सरकारकडे पैसा राहणार नाही, अशी टीका राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीने केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावर आणल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळून लावत वर्षभरापासून त्याची तयारी सुरू होती, असे स्पष्ट केले. आमच सरकार देणारे आहे, घेणारे नाही, असा दावा करतानाच मुख्यमंत्र्यांनी या योजनेसाठीची मदत पुन्हा सत्तेवर आल्यावर वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. एकीकडे मध्यप्रदेशातच लाडली बहन योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे, तर राज्यातील सरकार या योजनेच्या भरवशावरच पुन्हा सत्तेवर येण्याच्या प्रयत्नात आहे. अशावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT