Laxman Hake  Sarkarnama
महाराष्ट्र

Laxman Hake Vs Manoj Jarange : लक्ष्मण हाके कडाडले; म्हणाले, 'महाराष्ट्राच्या मानेवर जरांगे नावाचं वटवाघूळ बसू देणार नाही'

Maharashtra Election 2024 : मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीत जी भूमिका घेतील, त्यानुसार आमची भूमिका असेल, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष उभारणारे मनोज जरांगे महायुती सरकारविरुद्ध अधिकच आक्रमक झालेत.

भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिक टार्गेट केलं असतानाच, ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे आणि शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे.

'महाराष्ट्राच्या मानेवर जरांगे नावाचे वटवाघूळ बसू देणार नाही', असे म्हणत जिथे जिथे जरांगे पाटील उमेदवार देतील तिथे ओबीसीचा उमेदवार असेल, असे लक्ष्मण हाके यांनी म्हंटलं आहे. घराणेशाही पुरस्कृत असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) आणि इतर अनेक नेत्यांना ओबीसीला महत्त्वाचे पद द्यावं, असं का कधी वाटलं नाही?, असा सवाल देखील लक्ष्मण हाके यांनी केला.

'ही निवडणूक (Election) आरपारची आहे. आता नाही, तर पुन्हा लवकर नाय, असे म्हणत, राज्यातील सत्तेत असलेली महत्त्वाची पद कधीच ओबीसी नेत्याच्या वाटेला आली नाहीत. आता ओबीसी गप्प बसणार नाहीत, तो चांगला धडा शिकवेल', असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला.

उमेदवार निश्चित नाहीत

मनोज जरांगे या विधानसभा निवडणुकीला किती उमेदवार देणार, हे अजून स्पष्ट केलेले नाही. परंतु मध्यंतरी चाचपणी पूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं होते. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव लोकसभेला जाणवला. त्याचा फटका महायुती भाजपला मराठवाड्यात चांगलाच बसला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव कमी करण्यासाठी ओबीसी नेत्यांना महायुती सरकारनं बळ दिलं आहे. या विधानसभा निवडणुकीला नेमकं काय होतं, याकडे आता लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले

"देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना बे-दखल करण्याचं काम केलं आहे. सरकराकडून मराठ्यांना आशा होती की, सरकार आपल्या लेकरांना आरक्षण देईल. पण ती आशा आता सरकारनं संपवली आहे. शिवाय मराठ्यांची पोरं आरक्षणापासून वंचित राहिली पाहिजेत, भिकारी झाली पाहिजेत यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या विरोधात काम केलं".

मराठ्यांना डिवचण्यासाठी फडणवीसांनी ओबीसीत जाती घातल्या. त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली. मात्र आता आपण शेवटच्या थेंबापर्यंत लढायचं. मराठ्यांचे वाटोळे करण्यासाठी फडणवीसांनी सगळे डाव टाकले. पण मतं द्यायची की, नाही आता आमच्या हातात आहे. तुमचा सुद्धा सुफडा साफ केल्याशिवाय आम्ही शांत बसत नाही", अशा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT