CM Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde : लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे कितव्या स्थानी? अवघ्या 3 टक्के लोकांनी...

Roshan More

Eknath Shinde News : लोकसभा, विधानसभा निवडणूक आज झाली तर त्याचे काय परिणाम असतील तसेच लोकप्रिय मुख्यमंत्री कोण आहेत. या संदर्भात इंडिया टुडे-सी व्होटरने एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेची आकडेवारी समोर आली आहे.

या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात आजच्या घडीला निवडणूक झाली तर महाविकास आघाडी सरकार सत्तेत येईल. आणि त्यांना 150 ते 160 जागा मिळतील. महायुती सत्तेत येणार नसल्याचे सर्व्हेतून दिसत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रिये संबंधित देखील आकडेवारीने महायुतीचे टेन्शन वाढवले आहे.

देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या 10 जणांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्या पाच जणांमध्ये नाहीत. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पहिल्या स्थानावर असून त्यांना 33 टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे.

तर, दुसऱ्या स्थानावर अरविंद केजरीवाल, तिसऱ्या स्थानावर ममता बॅनर्जी आहेत. त्यांना अनुक्रमे 14 आणि 9 टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यादीत सहाव्या स्थानावर असून त्यांना 3 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

राज्यातही मुख्यमंत्री लोकप्रिय नाहीत?

आपापल्या राज्यात कोण कोणते मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत. याचा देखील सर्व्हे इंडिया टूडे सी वोटरने केला. विशेष म्हणजे आपआपल्या राज्यात लोकप्रिय असलेल्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाहीत.

यादीत सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमंग हे यादीत पहिला स्थानावर आहेत. तर, दुसऱ्या स्थानावर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा हे आहेत. तिसऱ्या स्थानावर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या कामगिरी कशी?

या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामगिरीवर 34.87 टक्के जणांनी खूप समाधानी असल्याचे सांगितले आहे. तर, 31.12 टक्के जणांनी समाधानी असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या कामगिरीवर समाधानी नसलेल्या संख्या 27.07 टक्के आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT