live update sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live updates : नागपूरमधील 1200 हून अधिक पारधी समाजातील विद्यार्थ्यांना न्याय

महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या, राजकीय बातम्या : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता या प्रक्रियेला वेग आला आहे.

Hrishikesh Nalagune

Nagpur : नागपूरमधील 1200 हून अधिक पारधी समाजातील विद्यार्थ्यांना न्याय

नागपूरमधील 1200 हून अधिक पारधी समाजातील विद्यार्थ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षानंतर या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

Yashomati Thakur : महिला आयोग झोपलं होतं का? यशोमती ठाकूरही संतापल्या

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर वादात सापडलेल्या महिला आयोगावर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही टीका केली. बीडमध्ये 850 हून अधिक महिलांची गर्भाशय काढण्यात आली. त्यावेळी महिला आयोग झोपले होते का? असा सवाल ठाकूर यांनी केला.

वैष्णवी हगवणेचा सासरा अन् दीर पुन्हा येरवडा कारागृहात

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशांत हगवणे यांची पुन्हा 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर सहआरोपी निलेश चव्हाण याला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Vaishnavi Hagvane : वैष्णवी हगवणेच्या सासू अन् नवऱ्याला पुन्हा अटक

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सासू लता हगवणे आणि नवरा शशांक हगवणे यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. म्हाळुंगे पोलिसांनी या दोघांचाही ताबा घेतला आहे. जेसीबी फसवणूक प्रकरणात या दोघांना अटक झाली आहे.

Rupali Chakankar : महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर मुंबईत मंथन

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रचंड टीका होता आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर मंथन होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडत आहे.

ठरलं! प्रभाग रचना राज्य सरकारच करणार

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता या प्रक्रियेला वेग आला आहे. राज्य सरकार या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करणार असून त्याबाबतचे आदेश येत्या दोन दिवसात निघण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने प्रभाग रचना केल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT