Ambadas Davne-Girish Mahajan News Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena Leader Ambadas Danve News : भाजप नेत्यांचे `भर अब्दुल्ला गुड थैली मे`, अंबादास दानवेंचा बावनकुळे, महाजनांना टोला

Jagdish Pansare

Shivsena UBT Political News : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापुर्वी राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारण्याची एकही संधी सत्ताधारी भाजप महायुती सोडत नाहीये. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे भुखंड प्रकरण आणि आता राज्याचे पर्यटन व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारावर खैरात लुटवण्यात आल्या आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार हल्ला चढवला.

भाजप (BJP) महायुतीच्या नेत्याचा हा प्रकार म्हणजे `भर अब्दुल्ला गुड थैली मे` असाच प्रकार असल्याचा टोला दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून लगावला. जाता जाता उरलं सुरलं सगळं वेचून न्यायचं! वित्त विभागाचा विरोध असताना पर्यटनमंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या सुतगिरण्यांना सरकारने दणदणीत खैरात दिली आहे, तब्बल 32 कोटीची.

एकीकडे बचत गटाची एवढी तेवढी रक्कम थकीत असेल तर महिलांना नवे कर्ज मिळणे कठीण होते. दुसरीकडे लोकांच्या घामाचा, कष्टाचा पैसा असा ठगबाकीदारांना नियम डावलून दिला जातो. जाता जाता पिशव्या भरण्याचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे! असा आरोप करतानाच `भर अब्दुल्ला गुड थैली मे` चा दुसरा अंक म्हणजे बावनकुळे यांचे भुखंड प्रकरण असा उल्लेख केला आहे.

राज्यातील तब्बल 30 एमटीडीसी रिसॉर्टच्या इमारती मोकळ्या जमिनींसह बिल्डरांच्या/भूमाफियांच्या घशात घालण्याचा डाव जागतिक पर्यटन दिनी राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने मांडला. (Ambadas Danve) याने हे रिसॉर्ट सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातीलच, पण या खासगीकरणाने पहिल्याच टप्प्यात 46 अधिकारी कर्मचारी (11 ऑक्टोबर 2024 पासून) आणि 200 इतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशा मराठी मुला-मुलींची नोकरी या निर्णयाने खाल्ली आहे.

एवढ्यावर ही लूट थांबत नाही तर या खासगी उद्योजकांना 20 टक्के कॅपिटल सबसिडी, 5 ते 15 वर्षे जीएसटी परतावा, स्टॅम्प ड्युटीवर बंपर सूट, कर्ज घेण्यास हमी ही खैरात करण्यात आली आहे. 1994 मध्ये चिकलदरा येथील रिसॉर्टसाठी कर्जासही एमटीडीसीने हमी दिली. परतफेड न केल्याने येथील रिसॉर्ट खासगी मालकाच्या घशात गेले असताना हा स्वस्तात जमिनी लाटण्याचा प्रकार सरकारने चालवला आहे, असा हल्लाबोल अंबादास दानवे यांनी केला आहे.

जागतिक पर्यटन दिनीच भूखंड माफियांना सरकारने घेऊन दिलेले दिवाळीचे हे फटाके आहेत. उडवा आणि विसरून जा.. प्रॉफिटधील प्रचंड मोठ्या शासकीय मालमत्ता कोणाच्या घशात घालायच्या आहेत, याचे उत्तर पर्यटनात शून्य इंटरेस्ट असलेले पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर द्यायला हवे, असे आव्हान दानवे यांनी दिले. या घोटाळ्यात गोवलेल्या 30 एमटीडीसी रिसॉर्ट्सची यादी, नोकरी जाणाऱ्यांची यादी दानवे यांनी आपल्या पोस्टसोबत जोडली होती.

या शिवाय याला म्हणतात कमाई चाराणे आणि खर्च बारणे, असे म्हणत सरकारच्या भोंगळ कारभारावर टीका केली. जेवढा निधी प्राप्त झाला तेवढ्याच रकमेची कामे मंजूर करणे हा साधा नियम आहे. 6738 कोटींची रक्कम प्राप्त झालेली असताना 86 हजार कोटींच्या रस्ते/पुलांच्या कामाला तर 30 हजार कोटींच्या नव्या/जुन्या कामांना मंजुरी देण्याचा प्रताप सार्वजनिक बांधकाम विभाग करते आहे!

राज्य दिवाळखोरीत तेव्हा निघते, जेव्हा राज्यकर्त्यांची बुद्धी दिवाळखोरीच्या मार्गावर असते. राज्यकर्त्यांबाबत आपण पहा, मात्र राज्य दिवळखोरीच्या मार्गावर मार्गस्थ होऊ नये म्हणून आपण तातडीने पाऊले उचलावीत, अशी विनंती करत अंबादास दानवे यांनी बांधकाम विभागाचे वाभाडे काढले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT