Nana Patole, Uddhav Thackeray, Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha election 2024 News : महाविकास आघाडीकडून 28 मराठा, तर 8 ओबीसी उमेदवार लोकसभेच्या रिंगणात

Political News : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्याची लगबग सुरू आहे. महाविकास आघाडीने तीन, तर महायुतीकडून अद्याप 9 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्याची लगबग सुरू आहे. महाविकास आघाडीने तीन तर महायुतीकडून अद्याप 9 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही.

महाविकास आघाडीकडून (MVA) आतापर्यंत 28 मराठा, तर 8 ओबीसी उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहे, तर एकही मुस्लिम उमेदवाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे (Shivsena) गटाकडून 21 पैकी 16 मराठा, 3 ओबीसी, 1 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमातीच्या उमेदवाराला लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. (Lok Sabha election 2024 News)

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आतापर्यंत नऊ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी 6 मराठा, 2 ओबीसी तर 1 अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला 17 जागा आल्या आहेत. त्यापैकी 15 जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. अद्याप दोन जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामध्ये काँग्रेसने 6 मराठा, 3 ओबीसी, 4 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमातीच्या उमेदवाराला संधी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकही मुस्लिम उमेदवाराला संधी नाही

महाविकास आघाडीकडून 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असली तर काँग्रेसची व्हाेट बँक असणाऱ्या मुस्लिम समाजाला मात्र सध्या घोषित केलेल्या महाविकास आघाडीच्या यादीत अजून एकही उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे उर्वरित तीन जागेवर तरी मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला संधी देण्यात येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT