bhimrao ambedkar | prakash ambedkar | anandraj ambedkar
bhimrao ambedkar | prakash ambedkar | anandraj ambedkar sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : आंबेडकर घराण्यातील तिघांना जनतेनं नाकारलं

Akshay Sabale

Lok Sabha Elections 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 'संविधान बचाव'चा नारा देत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. याचा फायदा विरोधकांना झाला आणि भाजपचं '400 पार'चं स्वप्न धुळीस मिळालं. पण, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( BabaSaheb Ambedkar ) यांच्या वंशजांना पराभवाचा धक्का बसला आहे.

या लोकसभेला आंबेडकर घराण्याचे तीन वारसदार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यातील भीमराव आंबेडकर ( Bhimrao Ambedkar ) आणि आनंदराज आंबेडकर यांना मानहारीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन बहुजन समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अनेक पक्षांची स्थापना झाली. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) हे गेल्या काही दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, अन्य दोन वंशजांनी यापूर्वी कधीही निवडणूक लढवली नव्हती.

यावेळी आंबेडकर घराण्यातून प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी वेगवेगळ्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. त्यात प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यातून 2 लाख 76 हजार 747 मते मिळाली. तर, अमरावती मतदारसंघातून आनंदराज आंबेडकर यांना 18 हजार 793, तर पंजाबमधील होशियारपूर येथून ग्लोबल रिपब्लिकन पक्षाकडून रिंगणात असलेल्या भीमराव आंबेडकर यांना केवळ एक हजार 41 मते पडली आहेत.

राजकीयदृष्ट्या सक्रिय नसतानाही आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. याला प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला होता. पण, कौटुंबिक दबावामुळे प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा उमेदवार मागे घेत आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केल्याची माहिती मिळत आहे.

भीमराव आंबेडकर यांनी पंजाबमधील होशिरायपूर या दलित राखीव मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी केली. भीमराव आंबेडकर यांचे वडील भय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर हे 1962 साली होशिरायपूरमधून निवडणूक लढले होते. या निवडणुकीत भय्यासाहेबांचा 7 हजार मतांनी पराभव झाला होता. भीमराव आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे काम करतात. त्यामुळे त्यांनी राजकारणात येऊ नये, असा सल्ला निकटवर्तीयांना दिल्याचं सांगितलं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT