Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad pawar PC : मंदिर-मशिदीवरुन राजकारण करणाऱ्यांना धडा, शरद पवारांनी सुनावले

Sharad Pawar press conference today : शरद पवारांनी आपण चंद्रबाबू अथवा नितीशकुमार यांच्याशी बोललो नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Roshan More

Sharad Pawar News : देशपातळीवर आमच्या दृष्टीने चांगले निकाल लागले आहेत. या निवडणुकीत आम्हाला उत्तर प्रदेशात साथ दिली. आता पुढे काय याबाबत इंडियाची उद्या बैठक होण्याची शक्यता आहे, असे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे सांगितले. मंदिर-मशि‍दीवरून राजकारण करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवल्याची टिपण्णीही पवार यांनी यावेळी केली.

भाजपप्रणीत एनडीएला बहुमता पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. मात्र, अनपेक्षितपणे इंडिया आघाडी 230 जागांच्या आसपास दिसत आहे. त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांना सोबत इंडिया आघाडी घेणार विशेष करून चंद्रबाबू नायडू आणि नितीशकुमार यांच्यासोबत घेणार असल्याच्या चर्चा होत्या.

त्यादृष्टीने शरद पवार यांनी नितीशकुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे सांगितले जात होते. मात्र यावर खुद्द शरद पवारांनी आपण चंद्रबाबू अथवा नितीशकुमार यांच्याशी बोललो नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शरद पवार म्हणाले, मी महाराष्ट्राच्या जनतेचा आभारी आहे. हा निकाल परिवर्तनाला पोषक आहे. देशाच्या लोकसभेची निवडणूकचे जे निकाल येत आहेत ते चित्र आशादायक आहे. उत्तर प्रदेशाचे जे निकाल येत आहेत. त्याची अपेक्षा आमच्या मित्रपक्षांनी देखील केली नव्हती. उत्तर प्रदेशमध्ये भाजप मोठ्या फरकाने जिंकते मात्र आता त्यांच्या जिंकण्यात तेवढा फरक दिसत नाही. आम्हाला उत्तर प्रदेशमध्ये यश मिळत आहे. त्यातून आम्ही देशपातळीवर योग्य काम करत आहे हे दिसत आहे.

मी नितीशकुमार, चंद्रबाबूंशी बोलतो नाही.मात्र आपले सहकारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, माकपचे सीताराम येचूरी यांच्याशी फोनवर चर्चा केली. इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत आज निर्णय होईल. मी त्या बैठकीला मी उपस्थित राहिल, असे देखील शरद पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT