New Delhi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांचे एक विधान शुक्रवारी लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले. त्यांनी लोकसभेत बीड जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्यांवर बोलण्याआधी लोकसभा अध्यक्षांविषयी विधान केले होते.
भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी सोनवणे यांनी बीडमधील मतदार, पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे आभार मानले. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांचे आभार मानताना ते म्हणाले, ‘आपले अध्यक्ष समजूतदार आणि अनुभवीही आहेत. खुर्चीवर बसून ते सत्तापक्षावरही लक्ष ठेवतात आणि विरोधकांवर विशेष लक्ष ठेवतात. त्यामुळे मी त्यांचेही आभार मानतो,’ असे बजरंग सोनवणे म्हणाले.
लोकसभेच्या पीठासीन अधिकारी संध्या रे यांनी त्यावर आक्षेप घेतला. माननीय सदस्य, तुम्ही असे बोलू शकत नाही, असे संध्या रे म्हणाल्या. तसेच सोनवणे यांचे अध्यक्षांबाबत केलेले विधान कामकाजातून काढून टाकण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्यानंतर सोनवणे यांनी आपले भाषण पुढे सुरू ठेवले.
भाषण सुरू करताना सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला. तर शरद पवारांसह मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनाही नमस्कार करत भाषणाला सुरूवात केली. यावेळी संसदेत पहिल्यांदाच आलेल्या खासदारांना बोलण्यासाठी जास्त वेळ देण्याची मागणी त्यांनी अध्यक्षांकडे केली.
सोनवणे यांनी भाषणादरम्यान बीड जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्यांचा पाढा वाचला. तसेच ऊसतोड कामगारांसाठी शासनाने काहीतरी विशेष मदत करण्याची मागणीही त्यांनी यावेळी गेली. बीड जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी त्यांनी केली. जिल्हा रुग्णालयांमध्ये पुरेस मनुष्यबळ नाही. पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे सामान्य रुग्णांचे हाल होत असल्याबद्दल सोनवणे यांनी चिंता व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.