Bjp News: भाजपने या आधी 195 जणांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचं नाव नव्हतं. त्यानंतर आता दुसरी यादी बुधवारी जाहीर झाली. त्यामध्ये राज्यातील 20 जणांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे.
दिल्लीत झालेल्या बैठकीत 2019 मध्ये जिंकलेल्या 23 जागा आणि पराभूत झालेल्या चंद्रपूर अशा 24 जागांवर चर्चा झाली. त्यापैकी 20 जागांवर आता उमेदवार घोषित केले आहेत. त्यामध्ये भाजपकडून पाच महिला लोकसभेच्या रिंगणात उतरवल्या आहेत.
जाहीर करण्यात आलेल्या या उमेदवारात नंदूरबार- हिना गावित, जळगाव- स्मिता वाघ, रावेर- रक्षा खडसे, दिंडोरी- भारती पवार, बीड- पंकजा मुंडे या पाच महिला उमेदवारांचा समावेश आहे. बीडमधून प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून त्यांच्या भगिनी पंकजा मुंडेना उमेदवारी देण्यात आली आहे.
दुसरीकडे मुंबईतून तिसऱ्यावेळेस निवडणूक रिंगणात असलेल्या पुनम महाजन यांच्या जागेबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. त्यांना उमेदवारी देणार की नाही याचा निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे या जागेबाबतचा निर्णय तिसऱ्या यादीत होण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यातून भाजपने (Bjp) जाहीर केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे : नंदुरबार- हिना गावित, धुळे -सुभाष भामरे, जळगाव- स्मिता वाघ, रावेर- रक्षा खडसे, अकोला- अनुप धोत्रे, वर्धा- रामदास तडस, नागपूर- नितीन गडकरी (Nitin Gadkai), चंद्रपूर- सुधीर मनगुंटीवार, नांदेड- प्रताप पाटील चिखलीकर, जालना- रावसाहेब दानवे, दिंडोरी- भारती पवार, भिवंडी- कपिल पाटील, मुंबई उत्तर- पीयूष गोयल, मुंबई उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा, पुणे - मुरलीधर मोहोळ, अहमदनगर -सुजय विखे पाटील, बीड- पंकजा मुंडे, लातूर- सुधाकर शृंगारे, माढा - रणजितसिंह नाईक निंबाळकर, सांगली- संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
R