Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar News Sarkarnama
महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : जागावाटपावरून राजकीय घडामोडींना वेग; आघाडीची बैठक, तर महायुतीबाबत 'ही' मोठी अपडेट

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. दुसरीकडे मात्र महायुतीचे जागावाटप रखडले आहे.

महायुतीची पुढील आठवड्यात दिल्लीत बैठक बोलाविण्यात आली असून यामध्ये जागावाटप फायनल होणार आहे. महायुतीच्या या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीस भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असून त्यामध्ये राज्यातील रखडलेल्या महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होईल, असे समजते.

या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपावर अंतिम चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी महायुतीमधील शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अजित पवार जागावाटपाबाबत अंतिम चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर जागावाटपाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, अजित पवार (Ajit pawar), चंद्रशेखर बावनकुळे, मी स्वतः आणि घटकपक्षाचे प्रमुख बसून 48 जागांबाबत सखोल चर्चा करू. आम्ही 45 प्लसचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय दिल्लीत होईल. तसेच 15 फेब्रुवारीपर्यंत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होईल, असे सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी सांगितले होते.

R...

SCROLL FOR NEXT