Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरू केली आहे. महायुती व महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप अजून रखडलेले आहे. त्यातच महाविकास आघाडीतील घटकपक्षातील बोलणी केवळ चार जागांवरून रखडलेली आहेत.
महाविकास आघाडीतील घटकपक्षांची बैठक नुकतीच पार पडली. महाराष्ट्राच्या जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा करण्यात आली. या चर्चेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सहभागी झाले होते.
या इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी व राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष सहभागी करून घेण्यासाठी चर्चा करण्यात आली. येत्या काळात प्रकाश आंबेडकर गटाला तीन जागा दिल्या जाऊ शकतात. दक्षिण मुंबई, पुणे, नाशिक आणि दिंडोरी या चार जागांवर बैठकीत एकमत झाले नाही.
काँग्रेसचे मिलिंद देवरा (milind devara) दक्षिण मुंबईतून निवडणूक लढविण्यासाठी आग्रही आहेत. त्या ठिकाणी ठाकरे गटाचे अरविंद सावंत (arvind sawant) दोन टर्म खासदार आहेत. त्यामुळे ठाकरे गट ही जागा सोडण्यास तयार नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुण्याची काँग्रेसची जागा राष्ट्रवादीला हवी आहे. नाशिक आणि दिंडोरी यापैकी एक जागा काँग्रेसला व एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे. त्यामुळे या चार जागांवर एकमत झाले नाही.
१५ जानेवारीला दिल्लीत वरिष्ठ नेत्यांचाही बैठक होणार आहे. त्या बैठकीत या चार जागांवर निर्णय होणार आहे. त्यानंतर आघाडीचे जागावाटप जाहीर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
(Edited by Sachin Waghmare)
R...